Who Is Nilesh Lanke: निलेश लंके कोण आहेत? जे आज दिवसभर आहेत चर्चेत

Know About MLANilesh Lanke's Political Career in Marathi: अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके हे आज दिवसभर चर्चेत आहेत. लंके हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांना धक्का देत शरद पवार गटात प्रवेश करू शकतात, अशी चर्चा आहे.
Who Is MLA Nilesh Lanke
Who Is MLA Nilesh LankeSaam Tv
Published On

Who Is Nilesh Lanke:

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके हे आज दिवसभर चर्चेत आहेत. लंके हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांना धक्का देत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करू शकतात, अशी चर्चा आहे. अशातच आज शरद पवार यांच्या उपस्थित लंके यांचा पुस्तक प्रकाशित करण्यात आलं आहे. यावेळी त्यांचा प्रक्षप्रवेश होणार असं बोललं जात होते, मात्र त्यावर अद्यापही सस्पेन्स कायम आहे.

लंके यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा खरी ठरल्यास राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अडचणी अहमदनगर जिल्ह्यात वाढू शकतात. अहमदनगरच्या पारनेर मतदारसंघात लंके यांना लोकांचं मोठं समर्थन असल्याचं बोललं जातं. कोविड काळात त्यांनी केलेल्या कामाची दखल देश पातळीवर घेण्यात आली. यातच निलेश लंके हे कोण आहेत, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Who Is MLA Nilesh Lanke
5 Central Government Schemes: केंद्र सरकारच्या या 5 योजना सामन्यांसाठी आहे खास, तुम्हीही घेऊ शकता लाभ

कोण आहेत निलेश लंके?

निलेश लंके हे अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर मतदारसंघाचे आमदार आहेत. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले. लंके यांचं 12 वी पर्यंत शिक्षण झालं असून नंतर त्यांनी आयटीआय केलं. त्यांनी विविध नोकरी केल्यानंतर हंगा स्टेशन येथे छोटे हॉटेल सुरु केले होते. मात्र नंतर ते बंद केलं. यानंतर ते सामाजिक कामात गुंतले.  (Latest Marathi News)

राजकीय प्रवासाला सुरुवात

निलेश लंके यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेनेतून केली होती. ते वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी शिवसेनेच्या शाखा प्रमुख झाले. त्यांनी पक्षात काम करत असताना हंगा गावची ग्रामपंचायत जिंकली होती. पुढे 27 फेब्रुवारी 2018 रोजी झालेल्या एका वादातून त्यांना शिवसेनेतून काढण्यात आलं.

Who Is MLA Nilesh Lanke
Vasant More Meet Sharad Pawar: वसंत मोरेंचं ठरलं? शरद पवार गटाच्या पक्ष कार्यालयात पोहोचले, प्रतिक्रियाही दिली

शिवसेनेतून काढल्यानंतर लंके यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकलीही. दरम्यान, आता चर्चा आहे की, ते शरद पवार गटात प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढू शकतात. मात्र असं असलं तरी अजूनही ही फक्त चर्चा आहे, ही चर्चा खरी ठरते का, हे येत्या काळात काळात कळू शकले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com