Sharad Pawar News: जयंत पाटलांकडून वयाचा उल्लेख, शरद पवारांनी लगेच हटकलं; वाक्यही मागं घ्यायला लावलं... VIDEO

Pune NCP News: पुण्यामध्ये निलेश लंके यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमादरम्यानही जयंत पाटील यांनी वयाचा उल्लेख केल्याने शरद पवार यांनी पुन्हा एकदा हटकल्याचे पाहायला मिळाले.
Pune NCP News:
Pune NCP News:Saamtv
Published On

नितीन पाटणकर, पुणे|ता. १४ मार्च २०२४

Jayant Patil On Sharad Pawar:

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ नेते शरद पवार हे प्रचंड उत्साही आणि दांडगा जनसंपर्क असलेले नेते म्हणून ओळखले जातात. शरद पवार यांना त्यांच्या वयाचा उल्लेख अन् वयावरुन टीका केलेली आवडत नाही, ज्याचे अनेक खास किस्सेही चर्चेत आहेत. आज पुण्यामध्ये निलेश लंके यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमादरम्यानही जयंत पाटील यांनी वयाचा उल्लेख केल्याने शरद पवार यांनी पुन्हा एकदा हटकल्याचे पाहायला मिळाले.

नेमकं काय घडलं?

पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे शरद पवार यांच्या भेटीला पुण्यातील पक्ष कार्यालयात आले होते. यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख केला. "आज इतकं वय झालं असेल तरी शरद पवार तरुणांना लाजवेल असं काम करतात," असे जयंत पाटील म्हणाले.

यावर शरद पवार (Sharad Pawar) यांनी तात्काळ जयंत पाटील यांना थांबवत अय्य... म्हणत एक कटाक्ष टाकला. शरद पवार यांच्या इशाऱ्यानंतर जयंत पाटील यांनीही मी माझे वाक्य माघारी घेतो, असे म्हणाले. जयंत पाटील यांच्या या वाक्यानंतर एकच हशा पिकल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचा व्हिडिओ सध्या माध्यमांवर व्हायरल होत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune NCP News:
Hingoli Crime News : शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्याचा चाकूने भोसकून खून, हिंगाेली पाेलिसांचा तपास सुरु

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला निलेश लंके यांच्या पक्षप्रवेशाचा सस्पेन्स अद्याप काय आहे. आज शरद पवार यांची निलेश लंके यांनी भेट घेतली. शरद पवार यांनीही निलेश लंके यांचे कौतुक करत स्वागत केले. मात्र निलेश लंके नेमके कोणत्या गटात? याबाबचे चित्र काही स्पष्ट झाले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं चाललयं काय? असा सवाल उपस्थित होत आहे. (Latest Marathi News)

Pune NCP News:
Loksabha Election 2024: जळगावमध्ये नणंद विरुद्ध भावजय लढत रंगणार? रोहिणी खडसेंच्या उमेदवारीबाबत जयंत पाटील यांचे सूचक विधान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com