10th Exam Fess: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ, आता किती फी भरावी लागणार?

What Is 10th Exam Fess: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली आहे.
दहावीचे परीक्षा शुल्क
10th Exam FessYandex
Published On

गिरीश कांबळे, साम टीव्ही मुंबई

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. दहावीच्या परीक्षा शुल्कात (10th Exam Fess) वाढ करण्यात आली आहे. दहावीच्या परीक्षा शुल्कात ५० ते १०० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. १७ नंबरचा परीक्षा अर्ज आणि नावनोंदणी शुल्कही महाग झाला आहे. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना आता परीक्षा देण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे. तर मग आता दहावीच्या विद्यार्थ्यांना किती शुल्क भरावा लागणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

१७ नंबरचा अर्ज भरून खासगीरित्या दहावीच्या परीक्षेला बाहेरून बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आता सर्वाधिक परीक्षा शुल्क भरावं लागणार असल्याचं समोर येत आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १७ नंबरच्या अर्जात ३० रुपयांनी वाढ केली आहे. तर नावनोंदणी शुल्कात ११० रुपयांनी वाढ केल्याची माहिती मिळत (10th Student News) आहे. याचा भार नक्कीच विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या खिशावर पडणार आहे.

नियमित विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क ४२० रुपयांवरून ४७० रुपये करण्यात आलं आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी जुलै-ऑगस्ट २०२४ आणि मार्च २०२५ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी सुधारित शुल्काचे (What Is 10th Exam Fess) दर जाहीर केले आहेत. आता इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काचा भार सहन करावा लागणार आहे. याबाबत अधिक माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

दहावीचे परीक्षा शुल्क
CBSE Board Exam News Today: सीबीएसईच्या विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी! एकाच वर्षी 2 बोर्ड परीक्षा?

आता हे नवीन शुल्क केव्हापासुन लागु केले जातील? तर राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी नुकतंच नव्या शुल्कासंदर्भात परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षाशुल्कात (10th Exam) वाढ करण्यात आली आहे. जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये पुरवणी परीक्षा होणार आहे. तर फेब्रुवारी-मार्चमध्ये मुख्य परीक्षा २०२५ होणार आहे. यावेळी ते नवे परीक्षा शुल्क आकारले जाणार आहेत.

दहावीचे परीक्षा शुल्क
Jai Shree Ram Written in Exam : उत्तरपत्रिकेत 'जय श्रीराम' लिहिलं, विद्यार्थी ५६ टक्क्यांनी पास; नेमका घोळ कसा झाला उघड?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com