ST Employee Strike
ST Employee StrikeSaam TV

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा छोट्या व्यावसायिकांना फटका; उपासमारीची वेळ

एसटी आगारात पाणी बाटल्या, रसवंती व इतर लहान मोठे खाद्यपदार्थ विकणारे हे छोटे मोठे व्यावसायिक आज रस्त्यावर आले आहे.
Published on

बुलढाणा: राज्य परिवहन एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे. या मागणीसाठी एसटी कर्मचारी (ST Employees) मागील तीन महिन्यांपासून राज्यभर आंदोलन करत आहे. त्यामुळे आपल्या एसटीची चाकं थांबली आहेत. तर दुसरीकडे एसटीची चाके थांबल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची लूट होत आहे. मात्र एसटी बसस्थानक परिसरात व्यवसाय करून उपजीविका भागवणाऱ्या परवानाधारक व्यावसायिकांवरही या संपामुळे उपासमारीची वेळ आली आहे.

एसटी आगारात पाणी बाटल्या, रसवंती व इतर लहान मोठे खाद्यपदार्थ विकणारे हे छोटे मोठे व्यावसायिक आज रस्त्यावर आले आहे. यामागे कारण एकच आहे एसटी बसचा संप. बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana) मध्यवर्ती बसस्थानकात व्यवसाय करणारे हे लोक कोणी यापैकी उसाचा रस विकतं, पोपकोर्न विकतं, कोणी पाण्याची बॉटल, तर कोणी खारे शेंगदाणे यावरच यांच्या घरची चुल पेटते. मात्र आता एसटी संप असल्याने प्रवाशांची संख्या घटली आहे. आणि याचा परिणाम थेट या व्यावसायिकांवर झाला आहे.

ST Employee Strike
Sharad Pawar Corona Positive: शरद पवार यांना कोरोनाची लागण

एसटीही सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी तर आहेच. परंतु या जीवनवाहिनीवर पोट भरणारेही अनेक जीव आहेत. मग एसटीमध्ये प्रवाशांना दोन पैसे मागून पोट भरणारे गोरगरीब भिकारी, असो की एसटीमध्ये फिरवून गाणे म्हणून लोकांचे मनोरंजन करणारे कलाकार, असो यांनाही याचा फटका बसला आहे. आता एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे ती एसटी पुन्हा थांबली आहे. परंतु एसटीचे चाके थांबले असले तरी हजारो कुटुंबाचे पोट भरणेही थांबले आहे.

असे असतांना दुसरीकडे एस ती महामंडळाने या जेरीस आलेल्या या परवानाधारकांना बंद काळातील भाडे भरण्यास डिमांड नोट आणि नोटिसेस देत आहेत. यामुळे बस्थानकातील परवाना धारकांवर आता नवीन आर्थिक संकट कोसळले आहे. जर बसस्थानकाचं बंद होते तर भाडे कश्याचे ? असा प्रश्न उपस्थित करीत महामंडळाने बंद काळातील परवाना भाडे माफ करावेअशी मागणी केल्या जात आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com