संजय जाधव साम टीव्ही, बुलढाणा
बुलढाण्यात (Buldhana News) एसटी भरधाव वेगाने चालवत एक एसटी चालक मोबाईलवर बोलताना दिसत आहे. हा एसटी ड्रायव्हरचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. रिसोड डेपोची एसटी बस सिंदखेडराजाहून संभाजीनगरला जात होती. त्यावेळी एसटी चालक फोनवर बोलत होता. तेव्हा एका प्रवाश्याने तात चालकाचा व्हिडीओ आपल्या मोबाईल मध्ये कैद केला आहे. एसटी चालकाकडून बस चालवताना मोबाईलचा वापर होत असल्याचं समोर आलं आहे.
या प्रवाशाने एसटी चालकाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, एका हाताने बसचे स्टेरिंग धरून चालक बस भरधाव वेगाने चालवत (ST Bus Driver) होता. तर दुसऱ्या हातात तो मोबाईल पकडून बोलत होता. हा धक्कादायक प्रकार रिसोड डेपोच्या बसमधील आहे. यावेळी चालक प्रवाशांच्या जिवाशी खेळत असल्याचं दिसून आलं आहे.
अगोदरच दररोज असंख्य अपघात होत (Driver Using Mobile While Driving) आहे. अनेक जनांना जीव गमावावा लागत आहे. त्यात असे एसटी चालक प्रवाश्यांच्या जीवाशी खेळताना दिसत आहे. वास्ताविक पाहता एसटी विभागाने पत्र जारी करत वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नये, असे आदेश पारीत केलेले आहेत. तहीही नियमाचं उलंघन होताना दिसत आहे. या बस चालकावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
आता या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काहीसं नाराजीचं वातावरण आहे. एसटी चालकाचा अगदी थोडासाही हलगर्जीपणा प्रवाशांच्या जीवावर बेतु शकतो. त्यामुळे वाहन चालविताना चालकाने काळजे घेणे गरजेचे (ST Bus Driver Viral Video) आहे. वाहन चालवताना मोबाईलचा वापर धोकादायक आहे. यामुळे जीवघेणा अपघात देखील घडू शकतो. चालकाच्या या कृत्यामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या मनामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.