Special Report : महाराष्ट्रात पवार-ठाकरे इज बॅक?; एक्झिट पोलनंतर शिंदे-अजित गटात अस्वस्थता?

Maharashtra Politics 2024 : एक्झिट पोलमध्ये पवार आणि ठाकरेंना कौल मिळाल्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटातल्या खासदार, आमदारांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरल्याची चर्चा आहे.
Special Report
Special ReportSaam Digital

विनोद पाटील, साम टीव्ही प्रतिनिधी

एक्झिट पोलमध्ये पवार आणि ठाकरेंना कौल मिळाल्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटातल्या खासदार, आमदारांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरल्याची चर्चा आहे. निकालातून हेच चित्र स्पष्ट झालं तर आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात पुन्हा मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. यावरचा हा विशेष रिपोर्ट.

भाजपला 18 जागांचा अदांज

शिंदेंच्या शिवसेनेला 7 जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय. मविआतल्या काँग्रेसला 6 जागा मिळण्याची शक्यता असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 9 जागांचा मिळण्याचा अदांज व्यक्त करण्यात आलाय. शरद पवारांची राष्ट्रवादीला 6 जागा मिळण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलनं दाखवलेल्या आकड्यांमुळे शिंदे आणि अजित पवार गटात कमालीची अस्वस्थता पसरल्याची चर्चा आहे.

शिंदे आणि अजित गटात अस्वस्थता?

शिंदे गटानं 13 जागा लढवल्या होत्या. यात बहुतांश विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आली. मात्र शिंदेंच्या केवळ 7 जागा निवडून येण्याची शक्यता आहे. तर अजित पवार गटाला केवळ चारच जागा मिळाल्या. त्यातही त्यांची केवळ एकच जागा निवडून येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलीय.

Special Report
Bhiwandi Lok Sabha : समाजकारण 'बाळ्या मामां'ना दिल्लीत पोहोचवणार की कपिल पाटील हॅट्रिक साधणार? काय असेल लोकसभेचा निकाल?

त्यामुळे शिंदे आणि अजित पवारांसोबत गेलेले खासदार आणि नेत्यांची चांगलीच अडचण होण्याची शक्यता आहे. तर महायुतीतल्या छोट्या पक्षांनी याचं खापर भाजपवर फोडलंय. भाजपनं विश्वासात न घेतल्यामुळेच महायुतीबाबत असं चित्र असल्याची अस्वस्थता शिंदे गटाचे समर्थक अपक्ष आमदार बच्चू कडूंनी बोलून दाखवलीय.

लोकसभा निवडणुकीत मोदी फॅक्टर असूनही महायुतीच्या 45 प्लसच्या ना-याला सुरूंग लागण्याची शक्यता आहे. महायुतीला लोकसभेत अपेक्षित यश मिळालं नाही तर आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत पवार-ठाकरेंचा सामना कसा करणार ही भीती शिंदे आणि अजित पवार गटातल्या आमदार-खासदारांना आहे. त्यामुळे अनेक बंडखोर पुन्हा स्वगृही परतल्यास विधानसभेपूर्वी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

Special Report
Raigad Lok Sabha : रायगडमध्ये तुल्यबळ उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला; सुनील तटकरे, अनंत गितेंसाठी अस्तित्वाची लढाई

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com