Bhiwandi Lok Sabha Election: समाजकारण 'बाळ्या मामां'ना दिल्लीत पोहोचवणार की कपिल पाटील हॅट्रिक साधणार? काय असेल लोकसभेचा निकाल?

Maharashtra's Bhiwandi Lok Sabha Election Result Battle: Kapil Patil VS Suresh Mhatre (Balya Mama): भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे कपिल पाटील आणि सुरेश म्हात्रे यांच्या निकाला दिवशी चुरस पहायला मिळणार आहे. जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे यांनी देखील निवडणूक लढवल्यामुळे तिरंगी लढत पहायला मिळाली आहे.
Bhiwandi Lok Sabha Election 2024: समाजकारण 'बाळ्या मामां'ना दिल्लीत पोहोचवणार की कपिल पाटील हॅट्रिक साधणार?  काय असेल लोकसभेचा निकाल?
Bhiwandi Lok Sabha Candidate Kapil Patil VS Suresh Mhatre (Balya Mama)Saam TV

भिवंडी लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सुरेश म्हात्रे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. त्यामुळे राज्याच्या राजकारणात या मतदारसंघानेही लक्ष वेधून घेतलं आहे. काल एक्झिट पोलचे अंदाज आले आता ४ जूनला निकाल लागणार आहे. यात कपिल पाटील हॅट्रिक करणार की सुरेश म्हात्रे त्यांच्या हॅट्रिकला सुरूंग लावणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणारआहे.

भिवंडी काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे मात्र मागच्या दोन निवडणुकीत भाजपच्या कपिल पाटील यांनी विजय मिळवला आहे. 2009 ला रचना करण्यात आलेल्या या मतदारसंघात पहिली निवडणूक काँग्रेसने जिंकली होती. त्यांनतर मात्र 2014 आणि 2019 या दोन निवडणुकांमध्ये भाजपचे कपिल पाटील निवडून आले आहेत. यावेळी अंदादे 48.89 टक्के मतदान झालं आहे.

कोण आहेत कपिल पाटील?

कपिल पाटील यांनी भिवंडी तालुक्यातील दिवे अंजूर गावाचे सरपंच म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं आहे. 2014 मध्ये पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आणि सलग दोन वेळा खासदारकीची निवडणूक जिंकली. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदही भूषवलं आहे.

कोण आहेत सुरेश म्हात्रे?

सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा ग्रामीण राजकारणातील एक महत्वाचं नाव आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या सुरेश म्हात्रे यांची जनतेच्या मदतीला धावून जाणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सर्वप्रथम शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात करत समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणात चांगला जम बसवला. ठाणे ग्रामीणमध्ये सुरेश म्हात्रे यांनी आपल्या धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मोठा जनाधार मिळवला आहे.

Bhiwandi Lok Sabha Election 2024: समाजकारण 'बाळ्या मामां'ना दिल्लीत पोहोचवणार की कपिल पाटील हॅट्रिक साधणार?  काय असेल लोकसभेचा निकाल?
Raigad Lok Sabha : रायगडमध्ये तुल्यबळ उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला; सुनील तटकरे, अनंत गितेंसाठी अस्तित्वाची लढाई

मुस्लीम मतदार निर्णायक ठरणार

भिंवडी लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा मतदार आहेत. त्यामुध्ये भिवंडीसह शहापूर, मुरबाड, कल्याण चा समावेश होतो. या मतदासंघात मुस्लीम मतदारांची संख्या २१ टक्के आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत मुस्लीम मतदार निर्णाय ठरत असतात. याशिवाय कुणबी ३७ टक्के, आग्री कोळी १५ टक्के तर दलित आणि इतर २७ टक्के मतदार आहेत.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत कपिल पाटील यांनी काँग्रेसच्या केशव तावरे यांचा दीड लाख मतांनी पराभव केला होता. त्यावेळी कपिल पाटील यांना ५ लाख 23 हजार मतं मिळाली होती. तर केशव तावरे यांना ३, 67,००० मतं मिळाली होती. यावेळी शरद पवार गटविरुद्ध भाजप अशी थेट लढत असली तरी जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे यांनी देखील निवडणूक लढवल्यामुळे तिरंगी लढत पहायला मिळाली आहे.

Bhiwandi Lok Sabha Election 2024: समाजकारण 'बाळ्या मामां'ना दिल्लीत पोहोचवणार की कपिल पाटील हॅट्रिक साधणार?  काय असेल लोकसभेचा निकाल?
Sangli Lok Sabha : कोण होणार सांगलीचा 'पाटील'? बंडखोरी पथ्यावर पडणार की महाराष्ट्र केशरी 'काकां'चा डाव पालटणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com