Accident In Beed
Accident In Beedविनोद जिरे

दुर्दैवी: बीडमध्ये ट्रॅक्टर-पिकअपच्या भीषण अपघातात बाप-लेकाचा मृत्यू

तर मुलीसह इतर तीन जण गंभीर जखमी
Published on

विनोद जिरे

बीड: गेवराई तालुक्यात हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ट्रॅक्टर आणि पिकपच्या झालेल्या भीषण अपघातात, चिमुकल्या मुलासह बापाचा मृत्यू झालाय. तर मुलीसह इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन रोडवर घडली आहे. (Beed Latest News In Marathi)

Accident In Beed
India Corona Update: भारतात कोरोना आकडेवारीत किंचित वाढ; 24 तासात 30,757 नवीन रुग्ण

गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन रस्त्यावर, रात्री 11 ते 12 च्या दरम्यान ऊसाची वाहतूक करणाऱ्या, ट्रॅक्टर व पिकअपची समोरासमोर जोराची धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, चंद्रशेखर शामराज पाठक (वय 39) व त्यांचा मुलगा आर्यन (वय 12) रा. राक्षसभुवन या बापलेकांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगी मंजरी चंद्रशेखर पाठक (वय 11) हिच्यासह इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान जखमींवर बीड शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

हे देखील पहा-

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com