
परभणी हिसांचार आणि सोमनाथ सूर्यवंशीप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन दिलं. तसेच या घटनेप्रकरणी न्यायालयीन चौकशी होईल आणि सूर्यवंशी कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर केली आहे. मात्र, सूर्यवंशी कुटुंबियांनी १० लाखांची मदत नाकारली. तसेच रिपोर्टनुसार सोमनाथला श्वसानाचा आजार होता असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, पण सोमनाथ यांना श्वसनाचा आजार नसल्याचं त्यांच्या भावांनी स्पष्ट केलं.
माझ्या भावाला कुठलाही आजार नव्हाता. हे खोटं आहे. माझ्या भावाला कोणताही श्वसनाचा आजार नव्हता, त्याची तब्येत ठणठणीत होती. त्याला कोणतं व्यसनही नव्हतं. आम्हाला न्याय हवा आहे. सरकारकडून आम्हाला हे अपेक्षित नव्हतं. सरकार योग्य निर्णय घेईल अशी अपेक्षा होती. पण त्यांनी योग्य निर्णय घेतलेला नाही. असं सोमनाथ सूर्यवंशी यांचा भाऊ प्रेमनाथ सूर्यवंशी यांनी म्हटलंय.
मुख्यमंत्री यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. १० लाखांची आम्हाला भीक नकोय. घटनेमध्ये पार्दशकता नाही. मुख्यमंत्री यांनी या घटनेचा व्यवस्थित अभ्यास करायला हवा. मुख्यमंत्री सोमनाथला श्वसनाचा आजार आणि त्याच्या शरीरावर जुन्या जखमा होत्या, असं सांगत आहे. पण रिपोर्टनुसार, सोमनाथचा मृत्यू जबर मारहाणीमुळे झालेला आहे. असा आरोप सोमनाथ सूर्यवंशी यांचा भाऊ अविनाश सूर्यवंशी यांनी केला आहे.
मला १० लाख रूपयांची गरज नाही. मला न्याय हवा आहे. मला माझा मुलगा हवा आहे. माझ्या मुलाला कसला आजार नव्हता. माझ्या मुलाला कसलं व्यसन देखील नव्हतं. पोलीस स्टेशनमध्ये माझ्या मुलाला बेदम मारहाण केलं आहे. माझ्या मुलाला मारण्याचा आदेश कुणी दिला? १० ते १५ डिसेंबरपर्यंत जेवढे पोलीस कामावर रूजू होते, त्यांना शिक्षा मिळायला पाहिजे. अशी मागणी मृत सोमनाथच्या आईनं केलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.