Solapur: सोलापूर विद्यापीठ ऑफलाइन पद्धतीने घेणार परीक्षा; जाणून घ्या तारीख

कॉपीमुक्त परीक्षेसाठी आणि परीक्षेत गैरप्रकार होऊ नयेत म्हणून भरारी पथकांची नियुक्ती केली जाणार आहे.
solapur university
solapur universitysaam tv
Published On

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या (solapur university) पदवी आणि पदव्युत्तर विभागाच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षा १५ जूनपासून ऑफलाइन (offline exam) पद्धतीने होणार असल्याची माहिती परीक्षा (exam) आणि मूल्यमापन मंडळ विभागाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी दिली. (solapur university exam dates marathi news)

डॉ. शिवकुमार गणपूर म्हणाले पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे मिळून ७० हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सम सत्राच्या या परीक्षा आहेत. सुरुवातीला अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होतील. १५ जून ते २० जुलैपर्यंत चालतील, असेही विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने स्पष्ट केले आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी आणि परीक्षेत गैरप्रकार होऊ नयेत म्हणून भरारी पथकांची नियुक्ती केली जाणार आहे.

solapur university
Anand Remake: आनंद मरा नहीं, आनंद मरते नहीं..; रुपेरी पडद्यावर पुन्हा येताेय 'आनंद'

विद्यार्थ्यांनी तणावमुक्त परीक्षा द्यावी, असे आवाहन परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणपूर यांनी केले आहे. दरम्यान दोन पेपरमध्ये एक की दोन दिवसांची सुटी असणार याबाबत विद्यापीठाकडून काहीच सांगण्यात आलेले नाही.

Edited By : Siddharth Latkar

solapur university
मला सत्तेचे काही घेणं देणं नाही; 'मविआ' च्या निर्णयावर आमदार प्रणिती शिंदे भडकल्या
solapur university
OBC Reservation: ओबीसींना दिलासा; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मिळाले आरक्षण
solapur university
Gyanvapi Mosque Case: 'ज्ञानवापी' प्रकरणी आदेश करु नये; SC ची वाराणसी न्यायालयास सूचना

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com