Solapur News : सोलापुरात दोन चिमुकलींचा मृत्यू दूषित पाण्यामुळे नव्हे तर...; महापालिका आयुक्तांची मोठी माहिती

Solapur Two Girls Die : डॉ. सचिन ओम्बासे म्हणाले की, संबंधित २ मुलींचा मेंदूज्वरमुळे अर्थात डेंग्यूमुळे त्या मुलींच्या प्लेटलेट्स कमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती त्यांनी दिली आहे.
Solapur Two school girls died of dengue
Solapur Two school girls died of dengueSaam Tv News
Published On

सोलापूर : सोलापुरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीत दूषित पाण्यामुळे दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, एक मुलगी गंभीर आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. नातेवाईक आणि स्थानिकांनी दूषित पाण्यालाच जबाबदार धरलं आहे. भाजपा आमदार देवेंद्र कोठे आणि महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र, या घटनेबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुलींच्या मृत्यूबाबत महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी माहिती दिली आहे.

डॉ. सचिन ओम्बासे म्हणाले की, संबंधित २ मुलींचा मेंदूज्वरमुळे अर्थात डेंग्यूमुळे त्या मुलींच्या प्लेटलेट्स कमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती त्यांनी दिली आहे. शहरातील कोणत्याही भागात डेंग्यूसदृश कोणत्याही आजाराची लक्षणे दिसली तर तात्काळ महापालिकेला कळवा, असं आवाहन महापालिका आयुक्त सचिन ओम्बासे यांनी सोलापूरच्या जनतेला केलं आहे.

Solapur Two school girls died of dengue
CM Fellowship: कामाची बातमी! तरूणांना सरकारी विभागांत काम करण्याची संधी; मुख्यमंत्री फेलोशिप जाहीर; वयोमर्यादा अन् मानधन जाणून घ्या!

नेमकं काय घडलं होतं?

दरम्यान, बाबू जगजीवन राम झोपडपट्टीत गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. भाजपा आमदार देवेंद्र कुठे यांनीही या दूषित पाण्याच्या पुरवठ्याची पुष्टी केली आहे. महापालिकेच्या हलगर्जी कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचं आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिलं असून, संबंधितांवर तातडीने कठोर उपाययोजना करण्यात येणार आहेत.

दोन मुलींच्या मृत्यूमुळे सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. भाग्यश्री म्हेत्रे (वय १६), जिया महादेव म्हेत्रे (वय १६) असं मृच मुलींची नावे आहेत. तर जयश्री महादेच म्हेत्रे (वय १८) हिची परिस्थिती गंभीर आहे.

Solapur Two school girls died of dengue
Water Crisis : पिण्याचा पाणीप्रश्न नाकातोंडाशी आला; आक्रमक आंदोलक वैनगंगा नदीपात्रात उतरले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com