Siddheshwar Yatra 2025 : महाराष्ट्रात यंदा पाऊस कसा असणार? सिद्धरामेश्वर महाराजांच्या महायात्रेत वासराची भाकणूक

Siddheshwar Yatra 2025 update : राज्यात वातावरण कसं राहील, यंदा पाऊस कसा राहील, याविषयी सिद्धरामेश्वर महाराजांच्या महायात्रेत वासराची भाकणूक केली आहे.
solapur news
solapur Saam tv
Published On

सोलापूर : सोलापूरच्या ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेची महाराष्ट्रभर चर्चा असते. या यात्रेतील भाकणुकीला अनन्यसाधारण महत्व आहे. या यात्रेत यंदाचे 2025 वर्ष शांत आणि स्थिर राहणार असल्याची भाकणूक करण्यात आली आहे. सिद्धरामेश्वर यात्रेतील महत्वाचा विधी होम प्रदिपण पार पडल्यानंतर भाकणूक वर्तवण्यात आली. 2024 ला जशी परिस्थिती होती, तीच परिस्थिती यंदाच्या वर्षी राहणार असल्याची भाकणूक करण्यात आली आहे. मुख्य पुजारी राजशेखर हिरेहब्बू यांनी परंपरेनुसार भाकणुकीबाबत माहिती दिली.

solapur news
Solapur Crime News : प्रमोद गायकवाड हा सोलापूरचा वाल्मीक कराड; तरुणाच्या हत्येनंतर नागरिकांकडून संताप

भाकणुकीसाठी आणण्यात आलेलं वासरू न बिथरता अतिशय शांत उभं राहिलं. त्यामुळे यंदाच वर्ष हे शांततेचं असण्याची भविष्यवाणी करण्यात आली आहे. भाकणुकीनुसार वर्षभर पीक,पाऊस स्थिर राहणार असल्याचही सांगण्यात आलंय. भाकणुकीसाठी देशमुख घराण्याचं मानाचं गाईचं वासरू दिवसभर उपाशी ठेवलं जातं.

solapur news
Solapur Name History: सोलापूर नाव कसं पडलं? रंजक इतिहास माहितीये का?

भाकणुकीच्या वेळी धान्य, कडधान्य,भाज्या,फळ त्याच्यासमोर मांडून ठेवली जातात. या सर्व पदार्थांना हा वासरू चाटतो की खातो यावरून भाकणूक सांगण्यात येते. या वासाराने मलमूत्र केल्यास भरपूर पावसाची शक्यता वर्तवली जाते. मात्र यंदा वासराने मलमूत्र न केल्याने मागच्या वर्षीप्रमाणे पावसापाण्याची स्थिती असण्याची शक्यता व्यक्त केली. सिद्धरामेश्वर महाराज यांच्या यात्रेत मुख्य पुजारी राजशेखर हिरेहब्बू हे परंपरेनुसार भाकणूक सांगतात.

solapur news
Solapur News: वधू-वरांना जेवण, ९५० वर्षांची परंपरा, पुरणपोळीचा नैवेद्य; कसा असतो योगदंडाचा पूजन विधी सोहळा?

मुख्य पुजारी काय म्हणाले?

सिद्धरामेश्वर महाराज यांच्या यात्रातील मुख्य पुजारी राजशेखर हिरेहब्बू म्हणाले,'ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेला सुरुवात झाली. आज कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. कार्यक्रम चांगला झाला. वासरूनं कशाला तोंड लावलं नाही. वासरू यंदा शांत होतं. त्याने मलमूत्र केलं नाही. त्यानुसार, गेल्या वर्षी जी परिस्थिती होती, तीच परिस्थिती यंदाही असणार आहे. गेल्या वर्षापासून पाऊस आणि वातावरण शांत आणि स्थिर राहील. आमच्या अंदाजानुसार वातावरण स्थिर राहील. वासरू शांत राहिल्याने भीतीचं वातावरण नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com