Sangola Vidhan Sabha : सांगोल्यात महायुतीत बिघाडी; दीपक साळुंखे निवडणूक लढवणार?

Solapur News : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कमला लागले आहेत. जागा वाटप अद्याप निश्चित झाले नसून सांगोल्यात महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे
Sangola Vidhan Sabha
Sangola Vidhan SabhaSaam tv
Published On

पंढरपूर : सोलापूरच्या सांगोल्यात महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे यांनी शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. त्यामुळे आमदार शहाजी पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election) सर्वच पक्ष कमला लागले आहेत. जागा वाटप अद्याप निश्चित झाले नसून सांगोल्यात महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महायुतीमध्ये सांगोल्याची जागा शिवसेनेकडे आहे. येथून पुन्हा शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष दिपक साळुंखे यांनी आमदार शहाजी पाटील (Shahaji Patil) यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावले आहे. मागील सहा महिन्यांपासून दिपक साळुंखे यांनी मतदार संघात निवडणूकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. गावभेट दौरा करून लोकांची मतं ही जाणुन घेतली आहेत. अलिकडेच कोलकत्ता आणि मुंबई येथील‌ गलाई कमगारांचा मेळावा घेऊन विधानसभा निवडणुकीत मदत करण्याचे आवाहन केले आहे. 

Sangola Vidhan Sabha
Bus Accident : हिरकणी बसचा भीषण अपघात, ४० विद्यार्थी जखमी

तर शहाजी पाटलांची अडचण वाढणार 

महिला मेळावा घेऊन मतदार संघात वातावरण निर्मिती केली आहे. साळुंखे यांची तयारी पाहता महायुतीत बिघाडी होण्याची अधिक शक्यता आहे.‌ साळुंखे यांची उमेदवारी कायम राहिली; तर शिवसेना आमदार शहाजी पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आमदार शहाजी पाटील दिपक साळुंखे यांची बंडाळी कशी थोपवू शकतात? यावर त्यांच्या विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे. दिपक साळुंखे यांनी बंडाळी केली तर आमदार शहाजी पाटील गोत्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com