सोलापूरच्या राजकारणात भूकंप, ३ दिग्गजांचा शिंदेसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदे म्हणाले...

Eknath Shinde latest news : सोलापूरच्या राजकारणात मोठा भूकंप झालाय. भगीरथ भालके कुटुंबासह अनेक दिग्गजांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या घडामोडींमुळे पंढरपूर आणि आसपासच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता.
Eknath Shinde latest news
Eknath Shinde latest news
Published On

Shiv Sena Maharashtra updates : भगीरथ भालके यांच्या पत्नी आणि पंढरपूरच्या नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके, माजी मंत्री आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत आणि शेकडो पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. भालके यांच्या प्रवेशामागील प्रसंग सांगताना शिंदे म्हणाले की, “ते मला म्हणाले माझं काय चुकलं? त्यावर मी सांगितलं तुझे आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलासी… आणि त्यांनी तात्काळ निर्णय घेत शिवसेनेत प्रवेश केला.” याच वेळी “मूळ शिवसेना कोणाची हे जनतेच्या न्यायालयात सिद्ध झालं आहे,” असे ठाम विधान करत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

“विकासाचा वारकरी आणि धाडसी निर्णय घेणारा जननेता” अशी ओळख अधिक ठळक करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरच्या पावन भूमीतून जनतेशी थेट संवाद साधत विकास, हिंदुत्व आणि जनसेवेचा ठाम संदेश दिला. ‘पुंडलिक वरदा हरी विठ्ठल’च्या गजरात झालेल्या या मेळाव्यात भगीरथ भालके यांच्या शिवसेना प्रवेशाने राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळाली, तर शिंदे यांच्या आक्रमक आणि भावनिक भाषणाने कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी निर्माण झाली.

Eknath Shinde latest news
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पीएम किसानचा २३ वा हप्ता हवाय? मग 'हे' काम लगेच करा

कार्यकर्त्यांना संदेश देताना त्यांनी “गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक” हे मिशन पुन्हा अधोरेखित केले. “प्रत्येक कार्यकर्त्याने एकनाथ शिंदे व्हा,” असे आवाहन करत त्यांनी पक्षवाढीवर भर दिला. “२०% राजकारण आणि ८०% समाजकारण” हा मंत्र देत जनतेचा विश्वास विकासात रूपांतरित करण्याचे त्यांनी आवाहन केले. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, रोजगार हमी मंत्री भारतशेठ गोगावले, आमदार तानाजी सावंत, आमदार राजू खरे, खासदार धैर्यशील माने, खासदार ज्योती वाघमारे, माजी आमदार शाहजीबापू पाटील, संपर्कप्रमुख चंद्रहार पाटील, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, जिल्हाप्रमुख चरणदास चवरे, अमोल शिंदे, शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पौराणिक संदर्भ देत शिंदे म्हणाले की, जशी भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणली, तसेच भगीरथ भालके पंढरपूरात विकासाची गंगा आणतील. त्यांच्या प्रवेशामुळे पंढरपूर, मंगळवेढा आणि माढा परिसरात शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भालके यांच्या खांद्यावरचा भगवा हा फक्त पक्षाचा नसून तो भागवत धर्माचा, प्रभू रामांचा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या परंपरेचा असल्याचे सांगत त्यांनी हिंदुत्वाचा ठसा उमटवला.

स्वतःला “महाराष्ट्राच्या विकासाचा वारकरी” संबोधत त्यांनी संत तुकारामांचा अभंग सादर केला “आला वारीचा दिवस, झाला आनंदे उत्सव… जुळती भक्तांची रांग, पुढे विठोबाचा संग… तुका म्हणे धावा रे…” तसेच “हम तो चले थे मंजिल मगर… लोग मिलते गए, कारवाँ बढ़ता गया…” या ओळींनी शिवसेनेचा वाढता प्रभाव अधोरेखित केला. दिवंगत भारत भालके यांच्या कार्याचा उल्लेख करत “जनसेवा हीच विठ्ठलसेवा” हा त्यांचा संस्कार असल्याचे त्यांनी सांगितले. “गोड बोलायचं आणि काम टाळायचं अशी काहींची वृत्ती आहे; पण भालके तसे नाहीत. जनतेचे समाधान भालकेच करू शकतात,” असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.

Eknath Shinde latest news
Ladki Bahin yojana : ₹१५०० चा हप्ता बंद का झाला? लाडक्या बहिणींना ‘या’ कार्यालयात समजणार नेमके कारण; ३००० रूपयांची अपडेट समोर

अनिल सावंत आणि तानाजी सावंत यांचा उल्लेख करत “काका-पुतण्याचे राजकारण महाराष्ट्राने पाहिले आहे; पण हे दोघे शिवसेनेत एकदिलाने काम करतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. धाराशिव जिल्ह्यात तुळजाभवानी मंदिर विकास, जलसंधारण, सिंचन आणि क्रीडा प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणात विकास होत असल्याचे त्यांनी सांगितले. मंगळवेढा येथील संत चोखामेळा आणि महात्मा बसवेश्वर स्मारकांच्या मागण्याही मान्य करण्याचा शब्द त्यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com