Sanjay Raut: 'CM शिंदे, फडणवीस अन् अजित पवारही सांगतात, मविआ 'इतक्या' जागा जिंकणार...', संजय राऊतांनी आकडा सांगितला!

Sanjay Raut Press Conference Solapur: 'स्वतः देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा खासगीत महाविकास आघाडीचा हाच आकडा सांगतात, असा मोठा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.
Sanjay Raut: 'CM शिंदे, फडणवीस अन् अजित पवारही सांगतात, मविआ 'इतक्या' जागा जिंकणार...', संजय राऊतांनी आकडा सांगितला!
Sajay Raut on MahayutiSaam TV
Published On

सोलापूर, ता. १३ सप्टेंबर

Sanjay Raut On Assembly Election: आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळेल, असा विश्वास व्यक्त करत येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडी 170 ते 175 जागा जिंकेल. स्वतः देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सुद्धा खासगीत महाविकास आघाडीचा हाच आकडा सांगतात, असा मोठा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. सोलापूरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले संजय राऊत?

"नांदेडपासून सोलापूरपर्यंत अनेक कार्यक्रम झाले, सोलापूरची तयारी पक्की आहे. दक्षिण सोलापूरची जागा ही शिवसेनेने अनेकदा जिंकलेली जागा आहे. महाविकास आघाडीमधील जागा वाटपाच्या चर्चेत जेंव्हा हा विषय येईल तेंव्हा चर्चा होईल. ही आमच्या संभाव्य उमेदवाराला कामाला लागा हे सांगायला हरकत नसते. ही जागा महाविकास आघाडीचेच आहे इथे शिवसनेचा आमदार असावं ही आमची इच्छा आहे," असे संजय राऊत म्हणाले.

मविआ इतक्या जागा जिंकणार..

तसेच "राज्यात महाविकास आघाडीसाठी अनुकूल वातावरण आहे. आम्ही महाविकास आघाडी मिळून 170 ते 175 जागा जिंकू. याबाबत कोणाच्याही मनात शंका असल्याचे कारण नाही, अगदी देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि शिंदे हे सुद्धा खासगीत मविआचा हेच आकडे देतील, बाकी त्यांनी कितीही बाता करु द्या. राज्यातील वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूने आहे," असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला.

Sanjay Raut: 'CM शिंदे, फडणवीस अन् अजित पवारही सांगतात, मविआ 'इतक्या' जागा जिंकणार...', संजय राऊतांनी आकडा सांगितला!
Maharashtra Politics : भाजपचा विरोध, महायुतीत वादाचा 'बुरखा'; शिंदेंच्या शिवसेनेला मुस्लिम मतांचा धसका? वाचा

फडणवीसांवर टीका..

दरम्यान, "महायुतीला प्रत्येक जागेवर आव्हान आहे. भाजपचा सर्वे चुकीचा आहे. भाजपला फक्त 13 ते 14 जागा विदर्भात मिळतील आणि सर्वात जास्त फटका नागपूरमध्ये बसणार आहे. देवेंद्र फडणवीस यांना आत्ताच त्यांच्या मतदारसंघात दम लागला आहे, त्यांना निवडणूक सोपी नाही. महाविकास आघाडीला मेहनत करावी लागेल, आम्हाला मोठे यश मिळेल, असा विश्वासही संजय राऊत यांनी लगावला.

Sanjay Raut: 'CM शिंदे, फडणवीस अन् अजित पवारही सांगतात, मविआ 'इतक्या' जागा जिंकणार...', संजय राऊतांनी आकडा सांगितला!
Pune Crime: पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत कायम, वाहनांची तोडफोड आणि घरावर दगडफेक; हडपसरमध्ये तणावाचे वातावरण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com