Poshan Aahar : विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! सोलापूरमध्ये पोषण आहारात आढळल्या उंदराच्या लेंड्या

Solapur News : सोलापूरमधील शालेय पोषण आहारात उंदराच्या लेंड्या आणि अळ्या आढळल्या आहेत. त्यामुळे पोषण आहार विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलाय का? असा सवाल उपस्थित केला जातोय.
Poshan Aahar
Poshan AaharSaam tv
Published On

भरत नागणे, साम प्रतिनिधी

Poshan Aahar: शालेय पोषण आहाराबाबत सातत्याने तक्रारी समोर येत आहेत. गुणवत्तेचा अभाव हा एक जुना प्रश्न असून, अद्याप त्यात सुधारणा झाल्याचे दिसून येत नाही. विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या वतीने पोषण आहाराचा पुरवठा केला जात असला तरीही या आहारात अळ्या, किडे, झुरळे आणि उंदरांच्या विष्ठा यांसारख्या धक्कादायक गोष्टी आढळत आहेत, जे अत्यंत चिंताजनक आहे. पोषण आहार विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलाय का? असा सवाल उपस्थित होत आहे. सोलापूरमधील सांगोल्यात पोषण आहाराच्या तांदळात उंदराच्या लेंड्या आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे.

शालेय पोषण आहारासाठी वापरल्या जाणाऱ्या तांदळात उंदाराच्या लेंड्या आढळून आल्या आहेत. हा धक्कादायक प्रकार सांगोला तालुक्यातील कमलापूर येथे समोर आला आहे. सांगोला तालुक्यातील अंगणवाडी आणि प्राथामिक शाळेतील विद्यार्थ्यांना तांदळाबरोबर इतर साहित्य दिले जाते. याच तांदळासह इतर धान्यामध्ये उंदाराच्या लेंड्या आणि आळ्या आढळून आल्या आहेत. हा धक्कादायक प्रकार स्थानिक नागरिकांनी समोर आला आहे.

सांगोला तालुक्यातील कमलापूर येथील गोडावूऊन हा शालेय पोषण आहाराची साठवण करण्यात आली आहे. याचं गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर उंदीर आणि घुशींचा वावर आहे. घुशीने मोठ्या प्रमाणावर तांदुळाची नासाडी केली आहे. पोत्यांमध्ये उंदारानी विष्ठा केली आहे. हाच निकृष्ठ आणि आरोग्याला हानीकारक तांदूळ पोषणहार म्हणून शाळांमध्ये वाटप केला जातो.

सांगोल्यातील सामाजिक कार्यकर्ते नितीन रणदिवे यांनी रात्री येथील गोडाऊनमधील निकृष्ट धान्याची वस्तुस्थिती समोर आणली. या घटनेनंतर गट शिक्षणाधिकार्यांनी पोषण आहाराचे गोडाऊन सील केले आहे. संबंधीत ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते नितीन रणदिवे यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com