Solapur BJP News: अजित पवार यांच्या पोस्टरला जोडे मार; सोलापूरात भाजपचे आंदोलन

अजित पवार यांच्या पोस्टरला जोडे मार; सोलापूरात भाजपचे आंदोलन
Solapur BJP News
Solapur BJP NewsSaam tv
Published On: 

सोलापूर : छत्रपती संभाजी राजे हे धर्मवीर नव्हे, स्वराज्य रक्षक होते; असे वक्तव्य केल्याप्रकरणी आज (Solapur) सोलापुरात अजित पवार यांच्या विरोधात शहर भाजपच्यावतीने पूर्व भागातील पद्मशाली चौकात अजित पवार यांच्या पोस्टरला जोडे मार आंदोलन करण्यात आले. यावेळी अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. (Tajya Batmya)

Solapur BJP News
Nandurbar News: सासरचा छळ, माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा; कंटाळून विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

धर्मवीर संभाजीराजांच्या विषयांमध्ये अवमान कारक उद्‌गार आणि उल्लेख केल्या प्रकरणी महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्‍या विरोधात राज्‍यभरात आंदोलन सुरू आहे. त्‍यानुसार भारतीय जनता पार्टी (BJP) सोलापूर शहरच्या वतीने निषेध करण्यात आला.

लोकांच्या मनामध्ये घर केलेल्या राष्ट्रपुरुषांना त्यांना मिळालेली जी बिरूदावली असते, त्याचे सर्टिफिकेशन करण्याचे कुठलेही अधिकार अजित पवार यांच्‍याकडे नाही. महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये देवा इतकीच प्रत्येकाच्या मनामध्ये जी व्यक्ती आहे. छत्रपती धर्मवीर संभाजी राजे यांच्या विषयाचे उद्‌गार काढलेले आहेत, ते खरोखर निषेधार्य आहेत. असे म्हणत भाजपच्यावतीने अजित पवार यांच्या पोस्टरला जोडेमार आंदोलन करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.