

सोलापूर महापालिका निवडणुकीचे आरक्षण सोडत जाहीर
दिग्गज नेत्यांसाठी निवडणूक लढवणे कठीण
पक्षांना नवीन उमेदवार आणि रणनीती ठरवावी लागणार आहे
पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक या महानगरपालिकांप्रमाणे सोलापूर महापालिकेचेही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलीय. संपूर्ण सोलापूर शहराचे लक्ष लागलेल्या महानगरपालिका निवडणुकीची आरक्षण सोडत हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयुक्त सचिन ओम्बासे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. सुरुवातीला प्रभाग 25 व 26 हे प्रभाग तीन सदस्यीय असल्याने त्यामध्ये दोन महिलांचे आरक्षण चिठ्ठी काढण्यात आली त्यात प्रभाग 25 हा सरळ दोन महिलांसाठी आरक्षित झाले.
त्यानंतर अनुसूचित जाती प्रवर्गाच्या 15 जागांपैकी 8 महिलांच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्यामध्ये 25, 13, 15, 4, 6, 21, 26, 17 हे महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. यामध्ये माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे, नूतन गायकवाड, वंदना गायकवाड, वैष्णवी करगुळे या सेफ झाल्या आहेत तर शिवसेना नेते मनोज शेजवाल, शिवा बाटलीवाला, सुभाष शेजवाळ, प्रवीण निकाळजे यांचे आरक्षण महिला झाल्याने अडचण झाल्याचे दिसून येते.
अनुसूचित जमातीच्या दोन जागांमध्ये प्रभाग 24 मधील एक जागा महिलांसाठी थेट आरक्षित झाली आहे, त्यामुळे माजी उपमहापौर राजेश काळे यांना धक्का बसला. ही जागा आरक्षित होताच ते सभागृह सोडून नाराज चेहऱ्याने निघून गेले. ज्या प्रभागात ना.मा.प्र. च्या दोन जागा राखीव होतील त्या प्रभागामधील एक जागा ना.मा.प्र. महिलांकरीता थेट राखून ठेवण्यात येईल. त्यामध्ये प्रभाग 14 व 18 हे थेट राखीव झाले.
ज्या प्रभागात अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीची जागा आहे मात्र ती जागा महिलांकरीता आरक्षित झालेली नाही अशा प्रभागातील ना.मा.प्र.ची जागा थेट ना.मा.प्र. महिला राखीव होईल. त्यामध्ये प्रभाग 1, 2, 5, 16, 22, 23 या सहा जागा थेट OBC महिला राखीव झाले. आणि चिठ्ठ्यामधून 9, 12, 3, 8, 11, 7 हे OBC महिला राखीव झाले.
सर्वसाधारण महिलांच्या जागा निश्चित करण्याकरीता सोडत काढण्याची आवश्यकता नाही. या जागा केवळ महिलांचे प्रमाण पूर्ण करण्याकरीता आवश्यक असलेल्या संख्येइतक्या जागा त्या त्या प्रभागात वाटप करुन देण्यात आल्या. त्यामुळे 58 सर्वसाधारण जागेपैकी त्यामध्ये 28 सर्वसाधारण जागा या महिलांसाठी राखीव झाले आहेत. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक किसन जाधव यांच्या प्रभाग 22 मध्ये अनुसूचित जाती सर्वसाधारण आणि ओपन मध्ये पुरुष झाल्याने त्या ठिकाणी किसन जाधव की नागेश गायकवाड या दोघांमध्ये कोण उभारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.