
विश्वभूषण लिमये, साम प्रतिनिधी
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना रविवारी अक्कलकोट येथे काळं फासण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतलीय. गायकवाड यांच्यावर करण्यात आलेल्या शाईफेकीनंतर मराठा समाजाची पुढची भूमिका काय असेल हे ठरवण्यासाठी सोलापुरात मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली मात्र याच बैठकीत मराठा समाजाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. (Solapur Maratha Community Meeting Descends into Chaos After Heated Remarks know Janmejayaraje Bhosale Told Whole Story)
सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या मराठा समाजाच्या पबैठकीत राडा का झाला कोणत्या गोष्टीमुळे कार्यकर्ते भिडले? याची संपूर्ण माहिती जन्मजयराजे भोसले यांनी दिलीय. सकल मराठा समाजाची सुरळीत बैठक सुरू होती. मात्र पंढरपूरच्या वकिलाने माझ्याबद्दल चुकीचे बोलल्यामुळे गोंधळ उडाला, अशी माहिती अक्कलकोट येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक आणि अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांनी दिलीय.
सकल मराठी समाज, क्रांती मोर्चा, सेवा संघ या मराठा संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रविण गायकवाड यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला, त्याच्या निषेधार्थ आणि समाजाची पुढची रुपरेषा काय असेल हे ठरवण्यासाठी ही बैठकी आयोजित करण्यात आली होती. तेव्हा सर्व काही सुरळीत चालू होतं. त्यावेळी पंढरपूरचे वकील रोहित फावडे भाषण करताना त्यांनी काही चुकीची माहिती दिली. त्यांना कदाचित चुकीची माहिती असावी, त्यांनी माझ्याबद्दल चुकीचं बोलल्यानं कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या, त्यामुळे बैठकीत गोंधळ उडाला.
दरम्यान जन्मेजयराजे भोसले यांच्या मुलाने म्हणजेच अमोलराजेने दीपक काटे याच्या कानात काहीतरी सांगितलं असा आरोप पंढरपूर्चाय वकिलाने घेतला होता. मात्र तो आरोप चुकीचा आहे, याउलट माझा मुलगा अमोलराजेने दीपक काटे याला सज्जड दम दिलाय असं जन्मेजयराजे भोसले म्हणालेत.
प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाईफेक नंतर मराठा समाजाची पुढची भूमिका ठरवण्यासाठी मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
सोलापूरच्या शासकीय विश्रामगृह सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील मराठा समन्वयक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते.
यामध्ये अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मजेयराजे भोसले हे देखील आपल्या समर्थकासह उपस्थित होते.
या बैठकीत पंढरपूरहुन आलेल्या ऍड. रोहित फावडे या तरुणाने मनोगत व्यक्त करताना अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मजेयराजे भोसले यांचा ऐकरी उल्लेख केला.
यावेळी ऍड. रोहित फावडे याने प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या दीपक काटे याच्या कानात अमोलराजे भोसले काय म्हणाले? असा आरोप केला.
याच ऐकरी उल्लेख आणि आरोपनंतर जन्मजेयराजे भोसले आणि अमोलराजे भोसले यांचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले.
आक्रमक समर्थक अॅड. रोहित फावडे याच्या अंगावर धावून गेले, प्रचंड मारहाण यावेळी या तरुणाला करण्यात आली. यावेळी बैठकीत प्रचंड गोंधळ उडाला.
बैठकीत उपस्थित समन्वयकांनी सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न केला. काहीच वेळात बैठकीच्या ठिकाणी पोलीस दाखल झाले, ऍड. रोहित फावडे याला पोलिसांनी आधी बाहेर काढलं
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.