Uddhav-Raj Thackeray Yuti: राज ठाकरेंशी युती होणार की नाही? १९ जुलैला उद्धव ठाकरे 'राज' उलगडणार?

Uddhav Thackeray Hint Alliance MNS: मराठीच्या मुद्द्यावरुन दोन ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले. दोन्ही बंधू एकत्र दिसल्याने राज्याच्या राजकारणात नव्या युतीच्या नांदीची चर्चा सुरू झाली.
Uddhav Thackeray Interview Teaser
Uddhav Thackeray Hint Alliance MNS
Published On

मराठीच्या मुद्द्यावरुन दोन ठाकरे बंधू एकत्र आले. एकाच व्यासपीठावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांना हिंदी सक्तीवरून ठणकावून सांगितलं होतं. त्या विजयी मेळाव्यातून ठाकरे ब्रँड काय ते सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर मात्र राज्याच्या राजकारणात नव्या युतीची चर्चा सुरू झाली. ठाकरे सेना आणि स्वत: उद्धव ठाकरे युतीबाबत सकारात्मक दिसून येत आहेत. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या सावध पवित्र्याच्या भूमिकेमुळे युतीचा विषय अजून भोपळ्यात आहे.( Sanjay Raut Post On X Uddhav Thackeray Interview Teaser)

मात्र उद्धव ठाकरे युतीसाठी प्रचंड सकारात्मक आहेत. याची प्रचिती वारंवार दिसून येत आहे. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. 'सामना'चे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतलीय. याचा टीझर नुकताच संजय राऊत यांनी आपल्या एक्स अकाऊंट पोस्ट केलाय. ज्यात उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे आपल्यासोबत आले आहेत, असं म्हटलंय. दरम्यान ही मुलाखत 'सामना'तून येत्या १९ आणि २० जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे.

या मुलाखतीचा टीझर आज राऊत यांनी ट्विट केलाय. यात उद्धव ठाकरे विविध मुद्द्यांवर रोखठोक मत व्यक्त करताना दिसत आहेत. याच टीझरमध्ये उद्धव ठाकरे यांनी ठाकरेंच्या आतापर्यंतच्या परंपरेवर बोलताना प्रबोधनकारांपासून बाळासाहेब ते अगदी स्वत: आणि आदित्य ठाकरेंचा दाखला दिला. यासोबतच त्यांनी राज ठाकरेंचंही यावेळी नाव घेतलंय.

"ठाकरे म्हणजे एक संघर्ष आणि हा संघर्ष मतलबी वाऱ्यांसाठी नाही. या संघर्ष आम्ही समाजाच्या हितासाठी करत आलो आहोत. माझ्या आजोबांपासून त्यांच्यानंतर शिवसेनाप्रमुख, मग मी, आता आदित्य आहे. आतासोबत राज आलेला आहे", असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं आहे. या मुलाखतीचा पहिला भाग १९ जुलै रोजी प्रसिद्ध होणार असल्याचं संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान राज ठाकरे यांनी युतीबाबत कोणतंही भाष्य न करण्याच्या सूचनाच सर्व कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं नाशिकमध्ये शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. यात राज ठाकरे मराठी मेळावा हा कोणत्याही युतीच्या पार्श्वभूमीवर नव्हता. तो फक्त मराठीच्या मुद्द्यावर होता. त्याचा राजकारणाशी संबंध नाहीये. युती संदर्भात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये बघू असं म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com