Solapur News : लग्नाळू तरुणांनो सावधान! सोलापुरात बोगस वधू-वर सूचक मंडळ उघडकीस; युवकांची 'अशी' झाली फसवणूक

Fake Marriage Bureau: लग्नाळू युवकांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून रजिस्ट्रेशन फी घेऊन फसवणूक करण्यात येत असल्याचा प्रकार बार्शीत उघडकीस आला
Marriage Bureau
Marriage BureauSaam tv

Fake Marriage Bureau News : लग्नाळू युवकांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून रजिस्ट्रेशन फी घेऊन फसवणूक करण्यात येत असल्याचा प्रकार बार्शीत उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी कथित वधू-वर मंडळ, चालक महिलांसह एजंटास बार्शी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकाराने बार्शी शहरामध्ये खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Marriage Bureau
Nashik News : नाशिकमध्ये खळबळ; एकाच कुटुंबातील ३ जणांची आत्महत्या

बार्शी तालुक्यातील बायपास रोडवर एका मंगल कार्यालयात सुशिक्षित मराठा महिला वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यासाठी तालुक्यातून हजारो महिला,पुरुष,पालक आणि लग्नाळू मुले वेगवेगळ्या वाहनांनी या ठिकाणी आलेली होते.या सर्व पालक आणि मुलांना तुम्हाला आज या ठिकाणी मुलगी दाखवली जाईल,तसेच मुलगी पसंत पडताच लगेच लग्न लावून दिले जाईल,असं सांगितले होते.

यातील कित्येक पालकांचा हा तिसरा मेळावा होता. मात्र, प्रत्यक्षात त्यांना नवरी काही पाहावयास मिळाली नव्हती. मार्चपर्यंत आपणास नक्की मुलगी मिळेल, असे सांगितले जात होते.मेळाव्यात सर्वांसमोर मुलांची नावे पुकारून बोलवले जात होते.

बऱ्याच पालकांच्या (Parents) आपली काहीतरी फसवणूक होत आहे,असे लक्षात आल्याने त्यानी नागरिकांना फोन करून सांगितले.जागरुक नागरिक येताच काहीतरी गडबड आहे,या ठिकाणी लोकांच्या भावनेशी खेळून खोटी आश्वासन दाखवून फसवणूक होत असल्याची बाब लक्षात येताच ही बाब पोलिसांना कळवण्यात आली.

एका कथित महिला (Women) वधू-वर सुचक मंडळाने आयोजित केलेल्या वधू- वर मेळाव्यासाठी बार्शीसह भूम, परंडा, वाशी, करमाळा, कळंब आदी तालुक्यांतील शेकडो लग्नाळू आले होते.या युवक आणि पालकांकडून पैसे घेऊन फसगत झाल्याची बाब उघडकीस आली आहे.

या पालकांच्या आणि मुलांच्या व्हॉट्सअॅपवर काही बायोडाटा, मुलींचे फोटोदेखील पाठवले होते, मात्र २४ तासांत ते फोटो डिलीट केले जात होते. यासोबतच कित्येक पालकांना तुम्ही लग्नाच्या तयारीनिशी या तुम्हाला मुलगी पसंत पडल्यास लगेच लग्न (Marriage) लावून देऊ किंवा आमच्या बीड येथील अनाथ आश्रमात काही मुली आहेत, त्यादेखील आपणास दाखवू आणि आपले लग्न दाखवून देऊ, असे आमिषही दाखवले गेले होते.

पोलिसांनी चौकशी केल्यानंतर हे वधू-वर सुचक मंडळ हे नोंदणीकृत नाही,तसेच या मंडळाने आजपर्यंत एकही लग्न लावून दिलेले नाही.केवळ आश्वासने दिलेली' असल्याचे यावेळी पोलिसांच्या वधू-वर -मंडळ चालक असलेल्या महिलेच्या बोलण्यावरून दिसून आले.

त्यामुळे पोलिसांनी तत्काळ सदरची महिला आणि त्यांचे दहा-बारा एजेंट यांना ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनमध्ये नेले. पोलिस ठाण्यात नेऊन त्यांची चौकशी केली. रात्री उशिरापर्यंत ही चौकशी सुरू होती. फसवणूक झालेल्या पालकांचे जबाब घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Marriage Bureau
Pune Accident: पीएमपी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात, दोन तरुणांचा जागीच मृत्यू

पालक आणि मुलांना तुम्हाला आज या ठिकाणी मुलगी दाखवली जाईल तसेच मुलगी पसंत पडताच लगेच लग्न लावून दिले जाईल, आश्वासन दिले जात होते. यासाठी लग्नाळू युवक तसेच त्यांच्या नातेवाइकांकडून रजिस्ट्रेशन फी म्हणून प्रत्येकी हजार रुपये आणि डिपॉझिट म्हणून तीन ते दहा हजार रुपयांपर्यंत रक्कम घेतल्याची बाबदेखील पुढे आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com