Maharashtra Kesari 2023:
Maharashtra Kesari 2023:Saamtv

Solapur News: सिकंदर शेखच्या कृतीने हृदय जिंकलं! स्वतः नकार दिला अन् वस्तादांची हत्तीवरुन काढली जंगी मिरवणूक

Maharashtra Kesari 2023: गतविजेत्या शिवराज राक्षेला आसमान दाखवत सिकंदर शेखने महाराष्ट्र केसरीची गदा उंचावली.

Solapur Breaking News:

गेल्या आठवड्यात २०२३ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार पार पडला. गतविजेत्या शिवराज राक्षेला आसमान दाखवत सिकंदर शेखने महाराष्ट्र केसरीची गदा उंचावली. अवघ्या २३ सेकंदाच्या या लढतीत सिकंदरने बाजी मारुन इतिहास रचला. महाराष्ट्र केसरीची गदा जिंकल्यानंतर आज (१९, नोव्हेंबर) सिकंदर पहिल्यांदाच त्याच्या गावी मोहोळमध्ये पोहोचला. यावेळी त्याचे गावकऱ्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले.

महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर सिकंदर शेख पहिल्यांदाच त्याच्या गावी पोहोचला. यावेळी पैलवान सिकंदर शेख (Sikandar Sheikh) यांचे जन्मगाव असलेल्या मोहोळमध्ये ग्रामस्थांनी त्याची जंगी मिरवणूक काढली. ढोल,ताशे, हलग्या, बँजो अशा मोठ्या लवाजम्यासोबत सिकंदरची ही जंगी मिरवणूक झाली. यावेळी गावातील ग्रामस्थ आणि कुस्ती शौकिनांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

विशेष म्हणजे यावेळी सिकंदरची हत्तीवरुन मिरवणूक काढण्याचे ठरले होते. मात्र हत्तीवरून आपली मिरवणूक काढण्यास नकार दिला. तसेच, आपल्याला सर्वात आधी कुस्तीच्या आखाड्याची ओळख करून देणाऱ्या पहिले वस्ताद रमेश बारसकर यांना हत्तीवर बसवले. सिकंदरच्या या कृतीचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Kesari 2023:
Sanjay Gadhvi Death: बॉलिवूडवर शोककळा! ‘धूम’च्या दिग्दर्शकाचं निधन; मॉर्निंग वॉकवेळी आला हृदयविकाराचा झटका

टीम इंडिया जिंकणार विश्वचषक..

यावेळी सामटिव्हीशी बोलताना सिकंदर शेखने भारतीय क्रिकेट संघाला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी शुभेच्छाही दिल्या. तसेच भारतीय संघ विश्वचषकाची ट्रॉफी जिंकणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला. दरम्यान, यावेळी सिकंदरने आपण हिंद केसरीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही सांगितले आहे. (Latest Marathi News)

Maharashtra Kesari 2023:
Namdev Jadhav News: नामदेव जाधवांच्या तोंडाला काळे फासल्याप्रकरणी मोठी अपडेट; १० ते १५ अज्ञातांवर गुन्हा दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com