Karnataka Politics: कर्नाटकातील राजकारणाचं महाराष्ट्र कनेक्शन; साकडं पूर्ण झाल्याने कार्यकर्त्याचं सोलापूर ते तुळजापूरपर्यंत दंडवत

महाराष्ट्रातील एका कार्यकर्त्याने चक्क कर्नाटकात काँग्रेसचा मुख्यमंत्री होण्यासाठी कार्यकर्त्याचं सोलापूर ते तुळजापूरपर्यंत दंडवत घालत जात आहे.
Karnataka Politics
Karnataka PoliticsSaam tv

Karnataka News: कर्नाटकात काँग्रेसने मोठा विजय मिळवल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं आहे. कर्नाटकात आमदारांची फोडाफोडी होऊन दुसऱ्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार की काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर कर्नाटकात पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याचा फैसला आज होण्याची शक्यता आहे.

याचदरम्यान, महाराष्ट्रातील एका कार्यकर्ता आई तुळजाभवानीकडे कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेसचे सरकार यावं, यासाठी घातलेलं साकडं पूर्ण झाल्याने सोलापूर ते तुळजापूरपर्यंत दंडवत घालत जात आहे. या कार्यकर्त्याची चर्चा सर्वत्र होत आहे. (Latest Marathi News)

कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेसचे सरकार यावं आणि मुख्यमंत्रीही काँग्रेसचाच व्हावा असं मागणं सोलापूरच्या एका कार्यकर्त्यांने तुळजापूरच्या आई तुळजाभवानीकडे मागितलं होतं. हे साकडे पूर्ण झाल्याने आता सोलापुरातील अनिल पाटील हा कार्यकर्ता, सोलापूरच्या भवानी माता मंदिरापासून तुळजापूरच्या आई तुळजाभवानी माता मंदिरापर्यंत दंडवत घालत जात आहे.

Karnataka Politics
Udayanraje Bhosale On Sharad Pawar : विश्वासघात... उदयनराजेंनी एका वाक्यात शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्याचा घेतला समाचार

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धुरा सांभाळल्यानंतर सुद्धा अनिल पाटील यांनी अशाच प्रकारे सोलापूर ते तुळजापूर दंडवत घातला होता. सोलापूर ते तुळजापूर हे ४६ किलोमीटरचं अंतर आहे.

Karnataka Politics
Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय केव्हा घेणार? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितले

दरम्यान, येत्या विधानसभेला महाविकास आघाडीने एकत्र येत भाजपाला टक्कर द्यावी आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री व्हावा असेही साकडं अनिल पाटील यांनी आई तुळजाभवानीकडे घातलं आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री झाला तर पुन्हा एकदा सोलापूर ते तुळजापूर दंडवत घालेन असं साकडं पुन्हा एकदा अनिल पाटील यांनी आई तुळजाभवानीकडे मागितलं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com