Ravish Kumar: जेष्ठ पत्रकार रविश कुमार पुणेकरांच्या भेटीला, दगडूशेठ गणपतीचे घेतले दर्शन; Video Viral

पुण्यातील लक्ष्मी रस्ता, आप्पा बळवंत चौक ते शिवाजी रस्ता असा प्रवास करत त्यांनी त्यांच्या खास शैलीत पुण्याचे वर्णनही केले आहे.
ravish kumar
ravish kumar saam tv
Published On

Ravish Kumar In Pune: पत्रकार क्षेत्रातील सर्वोच्च रेमेन मॅगेसिसे पुरस्कार विजेते जेष्ठ पत्रकार रवीश कुमार सध्या पुण्यामध्ये आले आहेत. पुण्याच्या प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीचे त्यांनी दर्शन घेतले. सध्या त्यांचा पुण्यातील प्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पुण्यातील (Pune) लक्ष्मी रस्ता, आप्पा बळवंत चौक ते शिवाजी रस्ता असा प्रवास केला. या प्रवासात त्यांनी खास त्यांच्या शैलीत पुण्याचे वर्णनही केले आहे.

ravish kumar
Dhule News: जयंत पाटील यांचे निलंबन मागे घ्या; राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

जेष्ठ पत्रकार रवीश कुमार सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. सध्या ते पुणे दर्शनास आले असून पुण्यातील रस्त्यावर फिरतानाचा त्यांचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. कोणत्याही शहराला सकाळी सकाळी पाहण्याचा अनुभव वेगळाच असतो असे त्यांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हणले आहे. या पुणे भेटीत त्यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शनही घेतले. (Dagadusheth Temple) त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ravish kumar
Tata Group: आता अमेरिकेतील मीडियावर टाटा समुहाची नजर; इतक्या कोटीला विकत घेतली कंपनी

दरम्यान, एनडीटिव्हीचे प्रमुख पत्रकार म्हणून रविश कुमार यांची ओळख होती. त्यांचा प्राईम टाईम शो प्रचंड यशस्वी ठरला. अलिकडेच अडानी समुहाने एनडीटिव्हीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर त्यांनी एनडीटिव्हीचा राजीनामा दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com