'सावध रहा! यदा कदाचित नितेशशिवाय निवडणुकीला सामोरे जावे लागेल'

जामीन अर्जावर आज दुपारी चार पर्यंत सुनावणी पुर्ण हाेईल असा अंदाज बांधला जात आहे.
narayan rane
narayan raneSaam Tv
Published On

सिंधूदूर्ग : कोणत्याही स्थितीत बँकेवर विजय मिळवायचा आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावेत. यदा कदाचित आमदार नितेश राणेंशिवाय (nitesh rane) निवडणुकीला सामोरे जावे लागले तर कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे. पुढचे दोन दिवस फार महत्त्वाचे आहेत. कार्यकर्त्यांनी सावध रहावे असा सल्ला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे अशी माहिती सूत्रांकडून समजते.

सिंधुदुर्ग (sindhudurg) जिल्हा बँकेची (dcc bank) निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राणे गट विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पहावयास मिळत आहे. शिवसेनेचे (shivsena) प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर नुकताच हल्ला झाला. हा हल्ला आमदार नितेश राणे (nitesh rane) यांच्या सांगण्यावरुन झाल्याचे शिवसेना आराेप करीत आहे. दरम्यान आमदार राणेंनी अटकपुर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. त्याची सुनावणी आज दुपारी चार पर्यंत पुर्ण हाेईल असा अंदाज बांधला जात आहे.

narayan rane
जे पाेलिसांनी लपवून ठेवलं ते खूद्द नारायण राणेंनीच सांगितलं

दूसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी जिल्हा बॅंक निवडणुकीवर लक्ष केंद्रीत आले आहे. राणे हे आज सकाळी रवींद्र चव्हाण यांच्यासमवेत भाजप जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीसाठी प्रहार भवनात आले हाेते. जिल्हा कार्यकारिणी सोडून अनेक पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित हाेते. यावेळी नारायण राणेंनी उपस्थितांना गाफील राहू नका असे सांगितल्याचे समजते.

narayan rane
हजर नव्हे..! पत्रकारांशी अधिक न बोलता नारायण राणे निघून गेले

सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार कोणत्याही स्थितीत बँकेवर विजय मिळवायचा त्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावेत. यदा कदाचित आमदार नितेश राणेंशिवाय निवडणुकीला सामोरे जावे लागले तर कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे. पुढचे दोन दिवस फार महत्त्वाचे. कार्यकर्त्यांनी सावध रहावे. नितेश राणेंना संताेष परब हल्ला प्रकरणात नाहक गोवलं जात आहे असेही राणेंनी बैठकीत म्हटल्याचे समजते.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com