

Summary -
सिंधुदुर्गमध्ये प्रेमी युगुलाची आत्महत्या
धरणात उडी मारून संपवलं आयुष्य
कणकवली तालुक्यात तरंदळे धरणात आढळले मृतदेह
तरुणाने तरुणीला आईच्या मोबाईलवरून मेसेज केला होता त्यावरून घटना उघडकीस
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये प्रेमी युगुलाने धरणात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. तरंदळे येथील धरणात तरुण-तरुणीने उडी मारली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. या दोघांनीही आत्महत्येसारखं टोकाचे पाऊल का उचलले? हे अद्याप समजू शकले नाही. या घटनेमुळे कणकवली तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कणकवली तालुक्यातील प्रेमी युगुलाने तरंदळे धरणात उडी मारत आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. मंगळवारी सायंकाळी या दोघांनी धरणात उडी घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तरुणी १८ वर्षांची होती ती कणकवली शहरात राहणारी होती. तर तरुण २२ वर्षांचा होता आणि तो कलमठ गावातील रहिवासी होता. मंगळवारी दुपारच्या सुमारास तरुणाचा मोबाईल हरवला होता.
मोबाईल शोधण्यासाठी हा तरुण काकाची दुचाकी घेऊन संध्याकाळी ७ वाजता घराबाहेर पडला पण रात्री उशिरापर्यंत तो घरी परत आला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला. स्वतःचा मोबाईल नसल्याने या तरुणाने आपल्या आईचा मोबाईल वापरला होता. याच मोबाईलवरून त्याने एका मुलीला व्हॉट्सअपवर मेसेज केला होता. त्याने या मुलीला 'आपण तरंदळे धरणावर जाऊया' असे सुचवले होते. हे मेसेज मुलाच्या कुटुंबीयांच्या वाचनात आल्यानंतर त्यांनी रात्रीच्या सुमारास तरंदळे धरण गाठले.
तरंदळे धरणात बॅटरीच्या सहाय्याने शोध घेतला असता धरणाच्या पाण्यामध्ये तरुण आणि त्या मुलीचा मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आणि ग्रामस्थ यांनी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास मृतदेह पाण्याबाहेर काढले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या घटनेची नोंद कणकवली पोलिसांनी केली असून ते पुढे तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.