सिंधुदुर्ग - देवगड तटरक्षक दलाच्या रडारवर असलेली रत्नागिरीतील Ratnagiri मच्छीमारी बोटीवर Boat चिनी कंपनीची एआयएस आयडेंटिफिकेशन सिस्टीम यंत्रणा बेकायदेशीर ठेवण्यात आली आहे. या दोन बोटी सागरी सुरक्षा पोलीस Police आणि मत्स्य विभागाने संयुक्त कारवाई केली आहे. या दोन्ही बोटी आचरा आणि कुणकेश्वर या समुद्रात मच्छिमारी Fishing करत होत्या.
हे देखील पहा -
देवगड तटरक्षक दलाल तीन बोटी समुद्रात मासेमारी करताना दिसून आल्या. कुणकेश्वर समुद्रात तीन बोटीवर सिग्नल फ्रिक्वेन्सी आढळून आली. त्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं. एका बोटीने एआयएस यंत्रणा बंद केल्याने ती बोट सापडू शकली नाही पण मात्र दोन बोटी सागरी सुरक्षा पोलीस आणि मत्स्य विभागच्या ताब्यात आहे.
देवगड मधील स्थानिक मच्छिमार नेत्यांनी बोटीवर गंभीर आरोप केले की, ही मुळात बोट अनधिकृत आहे. या बोटीना ट्रॉलरचा परवाना घेतलेला आहे. ट्रोलिंगचा परवाना घेतलेला असल्यामुळे पर्ससीन फिशिंग करता येत नाही. त्यामुळे ही बोटी अनधिकृत आहे. एआयएस यंत्रणा बसवली आहे ती सुद्धा चायना आहे. कमी वाव मधुन मासेमारी करत आहे. त्यामुळे बोटीवर कारवाई झाली पाहिजे ज्या विभागाने परवाना दिला आहे त्यांनी या बीटीवर कारवाई केली पाहिजे असे गंभीर आरोप मच्छिमार नेत्यांनी केले आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.