धक्कादायक : लोकवस्तीत येऊन कोल्हा करतोय माणसांवर हल्ला; भीतीचे वातावरण!

पनवेलमध्येे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; कोल्ह्याने आतापर्यंत १० जणांना केलंय जखमी !
धक्कादायक : लोकवस्तीत येऊन कोल्हा करतोय माणसांवर हल्ला; भीतीचे वातावरण!
धक्कादायक : लोकवस्तीत येऊन कोल्हा करतोय माणसांवर हल्ला; भीतीचे वातावरण!SaamTvNews

पनवेल : पनवेल तालुक्यातील माणघर, मोसारा, कुंडेवहाळ, भंगारपाडा येथील लोक सध्या कोल्ह्याच्या दहशतीने भयभीत आहेत. ही दहशत एवढी आहे की हा कोल्हा लोकांच्या घराजवळ वस्तीत येऊन दादागिरी अर्थात कोल्हेगिरी करत आहे. पनवेल (Panvel) तालुक्यातील ग्रामीण भागात कोल्हा हा प्राणी दिसून येतो. कोल्हा हा माणसाला घाबरणारा तसेच माणसाची चाहूल लागताच धूम ठोकणारा प्राणी आहे.

हे देखील पहा :

मात्र, सध्या या कोल्ह्याचे (Fox) कोणी काय बिघडविले आहे कोणास ठाऊक? तो सरळ-सरळ माणसांवर चाल करतोय. माणसांना घाबरणे सोडाच, लोकवस्तीत येऊन हा कोल्हा माणसांवर हल्ला करतोय. माणघर, मोसारा, कुंडेवहाळ, भंगारपाड्यातील 8 ते 10 जणांवर या कोल्ह्याने हल्ला केलाय. 8 ते 10 जखमींमध्ये लहान मुलाचाही समावेश आहे.

धक्कादायक : लोकवस्तीत येऊन कोल्हा करतोय माणसांवर हल्ला; भीतीचे वातावरण!
बीडमध्ये धारदार शस्त्रे घेऊन चोरट्यांच्या धुमाकूळ; घटना CCTVमध्ये कैद!

या कोल्ह्याच्या हल्ल्यातील नागरिकांवर उपजिल्हा रुग्णालयात (Hospital) उपचार सुरु आहेत. दरम्यान, कोल्हा हा प्राणी माणसाच्या वाटेला जात नाही. तो पिसाळल्यावरच माणसांवर हल्ला करतो. बहुतेक हा कोल्हा पिसाळला असावा त्यामुळे वनखात्याने तातडीने कारवाई करावी, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com