Maharashtra Vs karnataka : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शब्द फार जपून वापरले पाहिजे; संजय राऊत स्पष्टच बोलले

खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सीमावादाच्या मुद्द्यावरून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
Sanjay Raut and Amit Shah
Sanjay Raut and Amit Shah Saam Tv
Published On: 

Sanjay Raut News : शिवसेना ठाकरे गटातील नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सीमावादाच्या मुद्द्यावरून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात मराठीसाठी मराठी माणसासाठी सत्याग्रह केलेला आहे. त्यामुळे केंद्र गृहमंत्री अमित शाह यांनी शब्द फार जपून वापरले पाहिजे. सीमावादावरून उद्धव ठाकरे राजकारण कशाला करतील आणि तो प्रश्न सत्तर वर्ष भिजत पडलेला आहे, असं प्रत्युत्तर खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे. (Latest Marathi News)

Sanjay Raut and Amit Shah
Maharashtra Vs Karnataka : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी घेतली दिल्लीत गृहमंत्र्यांची भेट; बैठकीत नेमकं काय झालं? शिंदेंनी सविस्तर सांगितलं

खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी संजय राऊत म्हणाले, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यानंतर आम्ही सगळे आम्हाला जर राजकारण करायचं असतं, तर या प्रश्नावर १९६९ सालामध्ये आम्ही ७० हुतात्मे दिले नसते आणि बाळासाहेबांनी या प्रश्नाचे तुरुंगात भोगला नसता. छगन भुजबळ किंवा अनेक आमचे लोक त्या काळामध्ये बेळगावमध्ये गेले'.

'शरद पवार, एस एम जोशी, नानासाहेब गोरे, श्रीपाद अमृत डांगे, आचार्य अत्रे यांची नावे त्यांना माहित आहेत का? ज्यांनी त्या भागात जाऊन मराठीसाठी मराठी माणसासाठी सत्याग्रह केलेला आहे, असे संजय राऊत पुढे म्हणाले.

'त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुद्धा फार जपून शब्द वापरले पाहिजे. उद्धव ठाकरे राजकारण कशाला करतील आणि तो प्रश्न सत्तर वर्ष भिजत पडलेला आहे, असेही संजय राऊत (Sanjay Raut) पुढे म्हणाले.

Sanjay Raut and Amit Shah
Amit Shah: सीमावादावर गृहमंत्र्यांची मध्यस्थी; दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर महत्त्वाचे निर्णय

'मी आज सकाळी म्हटलं जर राम मंदिरासारखा प्रश्न सुटू शकतो तर महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न का सुटू नये? आजही बेळगाव सीमा भागामध्ये २४ लाख मराठी बांधव आहे. त्यांची एकच मागणी आहे की आम्हाला आमच्या भाषिक राज्यात जाऊ द्या. हे भाषिक राज्य घटनेनुसार निर्माण झालेलं आहे. मग बेळगावच्या मराठी लोकांना हा साधा प्रश्न आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेवर आरोप करण्यापेक्षा तुम्ही आमच्या लोकांना न्याय दिला तर बरं होईल, असा टोला संजय राऊत यांनी शाह यांना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.