Pandharpur: शिवसेना शिंदे गटातील आमदार पुन्हा वादात, पंढरपुरात VIP दर्शनाची मागणी; पत्र होतोय व्हायरल

Shiv Sena MLA Santosh Bangar: पंढरपूर मंदिरात व्हीआयपी दर्शनासाठी आमदार संतोष बांगर यांनी पत्र पाठवले. हे पत्र व्हायरल झाल्याने वारकऱ्यांत संताप पसरला असून राजकीय दबावाचा आरोप होत आहे.
Pandharpur Santosh Bangar
Pandharpur Santosh BangarSaam TV News
Published On

सतत वादग्रस्त विधानाने चर्चेत राहणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. व्हीआयपी दर्शनासाठी संतोष बांगर यांनी मंदिर समितीवर दबाव टाकल्याचं समोर आलं आहे. बांगर यांनी पंढरपूर मंदिर समितीला पत्र पाठवलं होतं. या पत्रात त्यांनी, 'माझ्या भावाला आणि कार्यकर्त्यांना व्हिआयपी दर्शन द्या' अशी मागणी केली आहे. बांगर यांनी पाठवलेलं पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या पत्रावर वारकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

सध्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून हजारो वारकरी पंढरपूरला दाखल झाले आहेत. दररोज दीड ते दोन लाख भाविक मंदिरात येत असून, त्यांना सुलभ दर्शन मिळावे म्हणून व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे. मात्र, तरीही काही लोक व्हिआयपी दर्शनासाठी विनंती करीत आहेत.

Pandharpur Santosh Bangar
NCP Youth Leader: पवार कुटुंबात लगीनघाई, युगेंद्र पवारांचा झाला साखरपुडा, सुप्रिया ताईंनी करून दिली सुनेची ओळख

कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी व्हिआयपी दर्शनासाठी पत्र पाठवून विनंती केली आहे. बांगर यांनी पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला एक पत्र पाठवलं. त्यांनी या पत्रामध्ये २१ कार्यकर्त्यांसाठी व्हीआयपी दर्शनाची विनंती केली आहे. या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, सत्ताधारी आमदाराचा मंदिर समितीवर अप्रत्यक्ष दबाव टाकल्याचा आरोप होत आहे.

Pandharpur Santosh Bangar
Politics: नागपूरच्या सराईत गुंडाचा शिवसेनेत प्रवेश, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत धनुष्यबाण घेतला हाती

हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जनतेच्या भावना दुखावल्या गेल्याचे बोलले जात आहे. एका व्यक्तीसाठी व्हिआयपी दर्शनासाठी रांगेतील वारकऱ्यांना ताटकळत उभे राहावे लागते. दरम्यान, वारकऱ्यांचा विचार न करता व्हिआयपी दर्शनाची मागणी केल्याने वारकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com