Sanjay Gaikwad: प्रसाद लाडांचा जन्म पाकिस्तानात झालाय, तर रावसाहेब दानवेंवरही शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल

मचा सगळ्यांचे बाप आहेत ना छत्रपती शिवाजी महाराज मग त्यांना एकेरी भाषेत बोलता.
Sanjay Gaikwad
Sanjay GaikwadSaam Tv

बुलडाणा : भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद आजही उमटत आहेत. आता शिवसेनेच्या शिंदे गटाचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी तिखट शब्दात दोन्ही नेत्यांचा समाचार घेतला आहे.

प्रसाद लाडांचा जन्म पाकिस्तानाता झालाय असं वाटतंय, असं संजय गायकवाड यांनी म्हटलं. तर रावसाहेब दानवे यांच्यावरही त्यांनी जोरदार निशाणा साधला.

Sanjay Gaikwad
Chhatrapati Shivaji Maharaj : उदयनराजेंचा 'निर्धार शिवसन्मानाचा' यास राजकीय वास; शिवेंद्रराजे

छत्रपती शिवाजी महाराज यांना बदनाम करण्याची व चिखलफेक करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलं काम करत असताना दुसरीकडे हे वाचाळवीर पक्षाला अडचणीत आणून हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.

या प्रसाद लाडांचा जन्म पाकिस्तानात झाला वाटतं. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कुठे झाला हे माहीत नाही, असं गायकवाड यांनी म्हटलं. (Maharashtra Politics News)

Sanjay Gaikwad
Pune MNS : पुण्यात मनसेला मोठं खिंडार! एकाच वेळी 400 कार्यकर्त्यांचे राजीनामे, वसंत मोरेही पक्ष सोडणार?

रावसाहेब दानवे हा छत्रपतींना शिवाजी म्हणतो. त्यांच्या बापाला ते नाव घेऊन हाक मारतात का? असा सवाल त्यांनी विचारला. आमचा सगळ्यांचे बाप आहेत ना छत्रपती शिवाजी महाराज मग त्यांना एकेरी भाषेत बोलता. माझी विनंती आहे की भाजपच्या फडणवीस साहेबांनी व नेतृत्वाने या वाचाळवीरांना आवरावे, असं आवाहन संजय गावकवाड यांनी केलं.

महाराष्ट्र हा शिवरायांचा अपमान कधीही सहन करत नाही. ठीक आहे की आम्ही मित्र पक्षासोबत आहोत. मुख्यमंत्री यांच्या सांगण्यावरून आम्ही गप्प आहोत. मात्र यापुढे शिवरायांचा अपमान सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

काय म्हणाले होते प्रसाद लाड आणि रावसाहेब दानवे?

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवरायांचा जन्म कोकणात झाल्याची चुकीची माहिती प्रेस कॉन्फरन्समध्ये दिली होती. तर रावसाहेब दानवे छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याचा एक व्हिडीओ शेअर केला होता. दोन्ही नेत्यांनी टीकेची झोड उठल्यानंतर माफीही मागितली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com