Ambadas Danve Dance Video: आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत अंबादास दानवेंचा भन्नाट डान्स; VIDEO तुफान व्हायरल

Ambadas Danve Dance : अंबादास दानवेंनी भीमसैनिकांसोबत सहभागी होऊन ढोल वाजवला. त्याचबरोबर हातात झेंडा घेऊन त्यांनी भन्नाट डान्स देखील केला.
Mla Ambadas Danve Dance of Ambedkar Jayanti Procession
Mla Ambadas Danve Dance of Ambedkar Jayanti ProcessionSaam Tv
Published On

Mla Ambadas Danve Dance Video: महाराष्ट्रासह देशभरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त ठिकठिकाणी भीमसैनिकांकडून जल्लोष साजरा केला जातोय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. (Latest Marathi News)

Mla Ambadas Danve Dance of Ambedkar Jayanti Procession
Dog Attack Video: आईसमोरच पिसाळलेल्या कुत्र्याचा चिमुकल्यावर हल्ला; थरकाप उडवणारी घटना CCTVत कैद

शहरातील क्रांती चौकातून मुख्य मिरवणूकीला सुरुवात झाली. या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात महिला, तरुणांसह नागरिक सहभागी झाले. मिरवणुकीत ढोल पथक देखील होते. या मिरवणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सुद्धा सहभाग घेतला. यावेळी अंबादास दानवे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

मिरवणुकीतील ढोल ताशांचा गजर पाहून दानवे यांना सुद्धा ढोल वाजवण्याचा मोह आवरला नाही. दानवेंनी भीमसैनिकांसोबत सहभागी होऊन ढोल वाजवला. त्याचबरोबर हातात झेंडा घेऊन त्यांनी भन्नाट डान्स देखील केला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Video) होत आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, अंबादास दानवे हे हातात झेंडा घेऊन डान्स (Dance Video) करताना दिसून येत आहे. त्यांनी निळा फेटा परिधान केला असून ते भीमसैनिकांच्या गरांड्यात दिसून येत आहे. अंबादास दानवेंना नाचताना पाहून भीमसैनिकांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतलं.

त्यानंतर हातात झेंडा घेऊन भीम सैनिकांच्या खांद्यावर असलेले अंबादास दानवे भन्नाट डान्स करू लागले. दरम्यान, शहरातून काढलेल्या सर्व मिरवणूका क्रांती चौकातून निघून पैठण गेट येथून गुलमंडी मार्गे भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत जाणार आहे. काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या नामकरणावरून चांगलाच वाद पेटला होता. त्यामुळे शहरात तणावाचं वातावरण होतं. (Breaking Marathi News)

मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण छत्रपती संभाजीनगर शहरात तसेच जिल्ह्यात शांततेचे वातावरण असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com