Crime News : शिवसेनेच्या माजी आमदाराचं संतापजनक कृत्य; पगार मागितल्याने शिक्षकाला शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल

संबंधित घटनेचा ऑडिओ व्हायरल होत आहे.
Crime News
Crime NewsSAAM TV
Published On

Shiv Sena: शिवसेनेचे माजी आमदार तुकाराम काते यांच्याविषयी मोठी बातमी समोर आली आहे. तुकाराम काते यांनी शिक्षकाला शिवीगाळ केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. पगार मागितल्याने शिक्षकाला फोन कॉल करत शिवीगाळ केली आहे. संबंधित घटनेचा ऑडिओ व्हायरल होत आहे.( Tukaram Kate)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, तुकाराम काते यांच्या संस्थेच्या शाळेत हा प्रकरा घडला आहे. येथे काम करणाऱ्या एका शिक्षकाला गेल्या काही महिन्यांपासून वेतन दिलेले नाही. शिक्षक गेल्या २३ महिन्यांपासून विनामोबदला शाळेत शिकवत आहे. म्हणजेच गेल्या २३ महिन्यांत सदर शिक्षकास पगार देण्यात आलेला नाही. आपला पगार मागण्यासाठी या शिक्षकांनी काते यांना फोन केला होता.

Crime News
Crime News : शिवसेनेच्या माजी आमदाराचं संतापजनक कृत्य; पगार मागितल्याने शिक्षकाला शिवीगाळ, ऑडिओ क्लिप व्हायरल

पगार देण्याऐवजी शिव्यांचा वर्षाव

तुकाराम काते यांच्या संस्थेची शाळा असल्याने संबंधित शिक्षकाने थेट त्यांच्याकडे आपल्या हक्काचे पैसे मागण्याचे ठरवले. मात्र त्यांना पगार न मिळता मोठ्या प्रमाणावर शिवीगाळ करण्यात आली. पगार देणार नाही पंतप्रधानांकडे तक्रार कर, असं या ऑडिओ क्लिपमध्ये तुकाराम काते शिक्षकाला बोलत आहेत. तसेच तसेच हात पाय तोडून हातात देईल म्हणतं शिक्षकाला शिवीगाळ करण्यात आली आहे.

शिक्षकांचा 23 महिन्याचा पगार तुकाराम काते यांच्या संस्थेमधून द्यायचा होता याची मागणी करण्यासाठी शिक्षकाने फोन केला होता. विद्यार्थ्यांना शिवकणे ज्ञान देणे आणि पुढील पिढी योग्य मार्गाने घडवण्याचे काम शिक्षक करत असतात. मात्र त्यांचा असा अवमान करणे आणि पगार न देणे या घटनेमुळे तुकाराम काते यांची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

Crime News
Viral News: ऐकावं ते नवलंच! कंपनीचं अजब फर्मान; खराब कामगिरी केल्यास कर्मचारी लगावणार एकमेकांच्या कानफटात

ऑडिओ क्लिप व्हायरल

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू येत असलेल्या आवाज तुकाराम काते यांचाच असल्यांत संबंधित शिक्षकांच म्हणणं आहे. शिवीगाळ सुरू होताच त्यांनी आपल्या फोनमध्ये सर्व संभाषण रेकॉर्ड करून घेतले. त्यानंतर सोशल मीडियावर देखील ही ऑडिओ क्लिप शेअर केली. ही ऑडीओ क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com