Shivendraraje Bhosale: 'छत्रपतीं' ची बदनामी करणा-यांना राजकीय पाठबळ? शिवेंद्रसिंहराजे

शांतता समितीची बैठक घेण्याबाबत मी जिल्हा पोलीस प्रमुखांना बोलणार असल्याचे शिवेंद्रसिंहराजेंनी स्पष्ट केले.
Shivendraraje Bhosale
Shivendraraje Bhosalesaam tv
Published On

Shivendraraje Bhosale News : छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) आणि देशाबद्दल चुकीचं बोललेल खपवून घेणार नाही. समाज माध्यमातून (social media) केल्या गेलेल्या व्हायरल पोस्टमुळे सातारा शहरातील वातावरण तणावपूर्ण झाले हाेते. शांतताप्रिय साता-यात काेण अशांतता पसरविण्याचा प्रयत्न करीत आहे त्या मास्टर माईंडला पाेलिसांना शोधावे. पाेलिस यंत्रणा कूठे कमी पडली तर उपमुख्यमंत्र्यांकडे दाद मागतिली जाईल असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (shivendraraje bhosale latest marathi news) यांनी माध्यमांशी बाेलताना स्पष्ट केले. (Maharashtra News)

Shivendraraje Bhosale
Khambatki Ghat News: पुण्याला निघालात? खंबाटकी बोगदा मार्गे जाणारी वाहतूक दाेन तासांसाठी राहणार बंद; जाणून घ्या कारण

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले समाज माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणा-या अल्पवयीन मुलास पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. संबंधित मुलगा पोलिसांच्या ताब्यात असताना पोस्ट पडल्या. मुद्दाम शहरातील वातावरण दूषित होण्याचे प्रयत्न कोण करताय का याचा पोलिसांनी शाेध घेऊन लवकर समोर आणले पाहिजे. सातारकरांना विनंती आहे पोलिसांना पोलिसांचे काम करु दे, प्रशासन योग्य कारवाई करेल असेही राजेंनी नमूद केले.

Shivendraraje Bhosale
Aam Aadmi Party News: "दादा, मुंबईत पोचलासा काय? काेल्हापूरातून 'आप' युवा आघाडीचा अजित पवारांना प्रश्न; जाणून घ्या आंदाेलन

राजकीय पाठबळ आहे का चाैकशी करा

छत्रपती शिवाजी महाराज आणि देशा बद्दल चुकीचं बोललेल खपवून घेणार नाही. या पोस्ट बाबत सखोल चौकशी पोलिस विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून होणे गरजेचे आहे असे सांगून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले युवकांना भडकवण्याचा काम होत आहे पण देशाबद्दल आपल्याला प्रेम असले पाहिजे. एखाद्या पक्षाबद्दल राग असेल म्हणून कोणीही देशावर बोलणे चुकीचे आहे. या घटनेला राजकीय पाठबळ आहे का याची चौकशी करायला पाहिजे असेही राजेंनी नमूद केले.

Shivendraraje Bhosale
Pune Metro : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी, गुरुवारपासून मेट्राेच्या वेळेत बदल, जाणून घ्या नवा निर्णय

पोलिसांनी एकदा खरे खोटे तपासावे

या घटनांच्या बद्दल शासनाने कायदे केले आहेत. या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. पालकमंत्र्यांनी सुद्धा कारवाईचे आदेश दिले आहेत. सायबर सेल कुठे तरी कमी पडत आहे. पोलिसांनीच एकदा खरे खोटे तपासावे. शांतता समितीची बैठक घेण्याबाबत मी जिल्हा पोलीस प्रमुखांना बोलणार असल्याचे शिवेंद्रसिंहराजेंनी स्पष्ट केले.

...अन्यथा उपमुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार

सायबर सेल न थोडे गांभीर्याने घ्यायला हवे होते. ते अकाऊंट ब्लॉक करायला हवे होते.पोलिस यंत्रणा कुठे कमी पडली का कमी पडली हे नंतर बघता येईल पण आज शहराला जो त्रास होतोय त्याबद्दल आधी पोलिसांनी कारवाई करावी. पोलिसांकडून यश नाही आलं तर आम्हांला उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलावे लागेल. या सगळ्याचे मास्टर माईंड शोधले पाहिजे आणि कारवाई केली पाहिजे असेही शिवेंद्रराजेंनी म्हटलं.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com