Maharashtra CM Oath Ceremony : शपथविधीआधी ट्विस्ट! उदय सामंत म्हणाले, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले नाही तर...

Eknath Shinde News : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का? याबाबत्या चर्चा सुरू आहे. उदय सामंत यानी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलेय. तासभरात एकनाथ शिंदे आपला निर्णय सांगतील असे सामंत यांनी सांगितले.
Uday samant on Eknath Shinde
uday samant on Eknath Shinde DCM
Published On

uday samant on Eknath Shinde DCM : एकनाथ शिंदे यांचा निर्णय एका तासात कळेल, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकरणार नाहीत, याबाबतच्या बातम्या आल्यानंतर उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. शिवसेनेच्या निमंत्रण पत्रिकेवरून एकनाथ शिंदे यांचं नाव गायब झाल्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले. शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या. त्यावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. (Devendra Fadnavis Maharashtra CM)

संध्याकाळी होणाऱ्या शपथविधी बाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घ्यावी अशी आमची सर्वांची भूमिका आहे. त्याला ते सहमत आहेत, अशी आम्हाला खात्री आहे. आमच्यातले 59 आमदार कोणीही उपमुख्यमंत्री होण्यास इच्छुक नाहीत. तसा आमचा मनात विचार नाही. थोड्याच वेळात एकनाथ शिंदे आपला निर्णय जाहीर करतील.

Uday samant on Eknath Shinde
Maharashtra CM Oath Ceremony : सस्पेन्स वाढला! एकनाथ शिंदे शपथ घेणार की नाही?

एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारलं नाही आणि आमच्याकडे जर जबाबदारी देण्याचं ठरवलं तर आम्ही ते स्वीकारणार नाही. आम्ही याबाबत कालच एकनाथ शिंदे यांना सांगितलं आहे. जर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारले नाही तर आमच्यापैकी कोणीही ते पद स्वीकारणार नाही. तेच उपमुख्यमंत्री होतील, आम्ही नकारात्मक विचार करत नाही, आम्हाला विश्वास आहे की एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असे उदय सामंत म्हणाले.

Uday samant on Eknath Shinde
Maharashtra Politics: राष्ट्रवादीच्या निमंत्रण पत्रिकेवरून एकनाथ शिंदेंचे नाव गायब, संकेत काय?

शिवसेना मर्ज होणार. अशी एक बातमी माझ्या नावाने पसरवली जात आहे. पण मी असं काहीही बोललो नाही. मी त्या वृत्त संस्थेशी चर्चा केली असता त्यांनी सांगितलं की आमचा यात संबंध नाही. त्यामुळे हे मोर्फ केलेलं आहे. मी पोलीस तक्रार करणार आहे. आम्ही कुठेही मर्ज होणार नाही, असे उदय सामंत म्हणाले.

Uday samant on Eknath Shinde
Devendra Fadnavis: फडणवीसच पुन्हा महाराष्ट्राचे बॉस, मुख्यमंत्री असताना कोणत्या योजना आणल्या?

ही जर प्रेशर टॅकटिक्स असती तर एकनाथ शिंदे यांनी दोन पत्रकार परिषद घेऊन आमचा जाहीर पाठिंबा असेल्याचं सांगितलं नसतं. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खातेवाटप याचा काही संबंध नाही. उपमुख्यमंत्रिपदी शपथ घेण्यापेक्षा पक्ष संघटन वाढीसाठी काम करतो, अशी त्यांची भूमिका होती. पण आमची भूमिका आहे की त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी...याबाबत आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, असे उदय सामंत म्हणाले.

पासेस प्रत्येक पक्षाने छापावे असं ठरलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या पक्षाच्या वतीने छापलं. आमची निमंत्रण पत्रिका ही शासनाच्या फॉरमॅटमध्ये छापली आहे, असे सामंत यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com