Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंच्या अटी शाळकरी मुलांसारख्या; ठाकरे बंधूच्या चर्चेतल्या युतीवर शिंदे गटाची मिश्कील टिप्पणी

Uday Samant on Raj & Uddhav Thackeray : मात्र, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चाहूल लागल्यापासून सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणल्याचं पाहायला मिळत आहे. कारण सत्ताधाऱ्यांनी यावर टिका केली आहे.
Uday Samant on Raj & Uddhav Thackeray
Uday Samant on Raj & Uddhav ThackeraySaam Tv News
Published On

पालघर : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे कधीतरी एकत्र येतील, अशी आशा त्यांच्या अनेक हितचिंतकांच्या मनात आहे. दोन्ही पक्षांमधील नेते, कार्यकर्ते अधूनमधून या चर्चेला हवा देत असतात. मात्र, अलीकडेच मराठीच्या मुद्द्यावर हे दोन भाऊ एकत्र येतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चाहूल लागल्यापासून सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणल्याचं पाहायला मिळत आहे. कारण सत्ताधाऱ्यांनी यावर टिका केली आहे.

राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या चर्चेतल्या युतीवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, 'उद्धव ठाकरे साद कोणालाही घालतील. मराठीचा हिंदुत्वाचा मुद्दा धरायचा सोडायचा, हिंदुत्वाचा मुद्दा धरायचा, सोडायचा. अशाने काही राजकारण होत नाही. राजकारण हे संवेदनशील असले पाहिजे. आता कुणीतरी काही देतं, असं ह्यांना वाटतं, अशा पोस्ट टाकून काही उपयोग होणार नाही. माझं मत मी स्पष्ट मांडलेलं आहे की, राज ठाकरेंचा एक वेगळा विचार आहे. त्यांचा एक वेगळा पक्ष आहे. कोणत्याही अटीला अधिन राहून राज ठाकरे झुकतील, असं मला वाटत नाही', असं म्हणत उदय सामंत यांनी विश्वास दर्शवला.

Uday Samant on Raj & Uddhav Thackeray
Sikkim Landslide : महाराष्ट्रावर दुसरं संकट! सिक्कीमध्ये भूस्खलन; मुसळधार पावसामुळे रस्ते बंद, अकोल्यातील १६ जणांचं डॉक्टर कुटुंब अडकलं

सामंत पुढे म्हणाले की, 'उद्धव ठाकरेंची अट काय आहे? एकनाथ शिंदेंशी बोलायचं नाही, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलायचं नाही. शालेय जीवनात आपण जेव्हा होतो तेव्हा हे असं होतं. याच्याकडे बघायचं नाही, त्याच्याकडे बघायचं नाही. हे राजकीय जीवनात चालत नाही. उद्धव ठाकरे यांच्या अटी शाळेतील लहान मुलांप्रमाणे आहेत', असंही उदय सामंत यावेळी म्हणाले.

दरम्यान, पोलिसांबाबत आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्याबाबत सामंतांना सवाल केला असता ते म्हणाले की, 'या मताशी आम्ही कुणीही सहमत नाही. महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस यांची एक वेगळी आख्यायिका आहे, वेगळा त्यांचा औरा आहे. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये व देशामध्ये काम करुन दाखवलं आहे. त्यामुळे गायकवाड यांचा काही गैरसमज झाला असेल तर आम्ही त्यांच्याशी बोलू, परंतु महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीसांबद्दल आम्हाला सर्वांना अभिमान आहे.

Uday Samant on Raj & Uddhav Thackeray
Delhi-Mumbai: एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात, पिकअप व्हॅननं ११ स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडलं; महामार्गावर मृतदेहांचे तुकडे विखुरले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com