Shocking Crime: ठाकरे गटाच्या नेत्यानं शेतकऱ्याला काळं निळं होईपर्यंत मारलं; व्हिडिओ व्हायरल

Shiv Sena leader Sachin Ghayaal: पैठणमधील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने उसाच्या थकबाकीच्या वादावर शेतकऱ्याला मारहाण केली. याबाबत शेतकऱ्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
Shiv Sena leader Sachin Ghayaal
Shiv Sena leader Sachin GhayaalSaam tv news
Published On

उसाच्या थकबाकीची मागणी करण्यासाठी घरी आलेल्या शेतकऱ्याला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने मारहाण केली आहे. ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणमधून उघडकीस आली आहे. या प्रकरणी शेतकऱ्याने थेट पोलीस ठाणे गाठत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

राहूल कांबळे असे शेतकऱ्याचे नाव आहे. तर, सचिन घायाळ असे आरोपी शिवसेनेच्या उपनेत्याचे नाव आहे. सचिन घायाळ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पदाधिकारी असल्याची माहिती आहे. राहुल कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उसाच्या थकबाकीची मागणी करण्यासाठी घायाळ याने शेतकऱ्याला घरी बोलावून घेतलं.

Shiv Sena leader Sachin Ghayaal
Sindhudurg: भीषण अपघातात दोन्ही ST बसचा चुराडा, समोरासमोर धडक अन् १०० फुटापर्यंत फरपटत नेलं

घराच्या ठिकाणी बोलावून घेतल्यानंतर राहूल यांना शिवीगाळ करत मारहाण केली. एक घटनेचा एक व्हिडिओही शूट करण्यात आला होता. मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केला. राहुल कांबळे यांनी श्री संत एकनाथ सचिन घायाळ शुगर लिमिटेड कारखान्याला मागील गळीत हंगामात ऊस दिला होता. काही पेमेंट मिळाल्यानंतर उर्वरित पेमेंट देण्यासाठी चार महिन्यांपासून टाळाटाळ केली जात होती. अशी माहिती शेतकऱ्याने दिली.

Shiv Sena leader Sachin Ghayaal
Black Magic: काळी जादूसाठी महिलेकडून अघोरी कृत्य! कुत्र्यांचं मुंडकं छाटत पूजा; पोस्टमार्टम रिपोर्टमधून हादरवणारी माहिती समोर

त्यानंतर, कांबळे यांना घायाळ यांनी रविवारी सकाळी घरी बोलावले. 'तुला पेमेंट देत नाही, काय करायचं ते कर..' असं म्हणत घायाळ याने शेतकऱ्यावर हल्ला चढवला. घायाळ यांच्यासह अमोल घायाळ, सुनील घायाळ, रवींद्र थोटे या चौघांनी मिळून काठीसह लाथाबुक्क्यांनी राहूल यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.

या घटनेनंतर त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com