अमरावती: राज्यभरात शिवजयंतीचा प्रचंड उत्साह आहे. वेगवेगळ्या कलाकृतीतून महाराष्ट्राच्या आराध्य दैवताला अभिवादन केलं जातयं. अमरावतीत जिल्ह्यातही शिवजयंती प्रचंड उत्साहात साजरी केली जाते. अमरावतीमधील (Amravati) श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट, अमरावती द्वारा संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात (Dr. Babasaheb Ambedkar Vidyalaya, Amravati) विविध नाविन्य पूर्ण उपक्रमांची मांडणी नेहमीच केली जात असले. त्याच अनुषंगाने विद्यालयात यावर्षीही छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या जयंती निमित्त टाकाऊ पासून टिकाऊ या संकल्पनेतून 55 फुट लांब व 10 फुट रूंद भव्य अशी तलवार तयार करण्यात आली आहे. (Shiv Jayanti 2022: Shivsrishti achieved on a 55 feet sword ...)
हे देखील पहा -
तसेच ह्या संस्थेच्या सन्मानिय अध्यक्षा सौ. किर्तीताई राजेश अर्जुन आपल्या मार्गदर्शनातून सांगत असतात की, विद्यालयात नेहमी विद्यार्थी पुरक उपक्रम झाले पाहीजे. त्याच्या या मार्गदर्शनातून नाविण्यपूर्ण संकल्पना मांडण्याची विद्यालयाला प्रेरणा मिळते. त्यातूनच ही भव्य अशी 1 क्विंटल 10 किलोची तलवार रूपी कलाकृती तयार करण्यासाठी दिड क्विंटल पुठदा, कागद, कापड, 50 किलो फेविकॉल या विविध वस्तुंचा वापर करून तलवारीची प्रतिकृती 18 दिवसात पुर्ण साकारलेली आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक आशिष देशमुख यांच्या संकल्पनेतून तलवारीची निर्मिती व कला शिक्षक श्रीकांत काळबांडे यांनी तलवारीला स्वरूप देण्यासाठी कला मंडळातील सदस्य शेख रेहान, केतन शिंगाडे, हर्षल येवले, आर्यन कोसमकर, हर्षल शहारे शंतनू मानकर मनिष कंकरवाल, निखिल पछेल, अयान जरे, आदित्य दिवान, उवैस कुरेशी, जान्हवी शेंडे, भाग्यश्री मेश्राम, फिरदोस गोचेवाले वैष्णवी माकोडे, नायरा मोहंमद, खतीजा गोचेवाले, प्रतिमा सुडे, साक्षी गेडाम यांच्या मदतीने कलाकृती पूर्ण केली.
महाराजांचे एक आभुषण म्हणुन तलवारीची मांडणी करण्यात आली. या तलवारीवर शिवकालीन शिवसृष्टी साकारण्यात आली. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्यनिर्मितीसाठी शिवरायांच्या मदतीस सतत तत्पर असणाऱ्या आभूषणांची मांडणी तलवारीवर करण्यात आली. त्यामध्ये राजमाता जिजाऊ यांची चंद्रकोर, शिवपिंड, जिरे टोप, मावळा टोपी, किल्ला ध्वज, अश्या विविध शिवकालीन आभुषणामुळे या तलवारीला स्वराज्य निर्मीतीचे बळ आले आहे. या सर्वांचे प्रतिक म्हणून राजमुद्रा या तलवारीवर अंकीत आहे अश्या या तलवारीला तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांसोबत विद्यालयातील शिक्षक विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.