Shirdi News: साईबाबांच्या झटपट दर्शनाची आस; महिला साईभक्ताकडून उकळले साडेतीन हजार

Shirdi News : साईबाबांच्या झटपट दर्शनाची आस; महिला साईभक्ताकडून उकळले साडेतीन हजार
Shirdi News
Shirdi NewsSaam tv
Published On

सचिन बनसोडे 

शिर्डी (अहमदनगर) : शिर्डीत साईभक्तांच्या फसवणूकीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. दर्शन पासच्या (Shirdi) काळाबाजाराचा विषय चव्हाट्यावर आलेला असतानाच दलालांकडून झटपट दर्शनाचे आमिष दाखवून साईभक्त महिलेची आर्थिक फसवणूक (Fraud) केल्याची आणखी एक घटना समोर आली. यात महिलेकडून साडेतीन हजार रुपये उकळल्याचे समोर आले आहे. (Latest Marathi News)

Shirdi News
Bar Council Of India : वकील रणजीतसिंह घाटगे याची सनद रद्द, १४ लाख दंड देण्याचाही हुकूम; जाणून घ्या पक्षकाराची तक्रार

शिर्डीत साईबाबा दर्शनासाठी देशभरातून दररोज हजारो भाविक येत असतात. मात्र शिर्डीत प्रवेश करताच अनेक एजंट भाविकांना झटपट दर्शनाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करत असतात. अशाच पद्धतीने त्रिपुरा राज्यातील पूनम भौमिक या परिवारातील वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांसह शिर्डीत साईबाबांच्या (Saibaba) दर्शनासाठी आल्या होत्या. शिर्डीत प्रवेश करताच दुचाकीवरून आलेल्या काही एजंटने त्यांना लवकर दर्शन करून देण्याचे सांगितले. त्यानंतर हे एजंट त्यांना मंदिर परिसरातील एका खाजगी हार- फुल प्रसादाच्या दुकानात घेऊन गेले. त्याठिकाणी त्यांना चक्क साडेतीन हजार रुपयांचे प्रसादाचे ताट बनवून दिले आणि ताट मंदिरात घेऊन गेल्यानंतर तुम्हाला झटपट दर्शन मिळेल असे आमिष दाखवले. 

Shirdi News
Cyber Crime : 'ऑनलाईन टास्क' ला युवती भुलली, ४ लाख ६७ हजार गमावले

मंदिरात फुल हार नेण्यास मनाई 

मात्र सदर महिला दर्शन रांगेत गेल्यानंतर साई मंदिरात फुल, हार, प्रसाद घेऊन जाण्यास बंदी असल्याचे तीला सुरक्षा रक्षकांनी सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तीने संबंधीत दुकान गाठले. यावेळी दुकानदार आणि साईभक्त महिला यांच्यात शाब्दिक वाद झाले. मात्र महिलेने पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे सांगताच दुकानदाराने तिला पैसे परत केले. इतरांची फसवणूक होऊ नये यासाठी पूनम भौमिक यांनी आपली व्यथा प्रसार माध्यमांसमोर मांडली.

कोव्हिड काळापासून साई मंदिरात हार प्रसाद बंदी आहे. अशा वेळी भक्तांची फसवणूक होत असेल तर ते चुकीचे असल्याची प्रतिक्रिया शिर्डी ग्रामस्थांनी दिली. साईबाबा संस्थानने सुद्धा हार प्रसाद स्वीकारत नसल्याचे मोठे फलक लावले तर फसवणूक होणार नाही. शहरात सध्या एजंट मोठ्या प्रमाणात फिरताना दिसत असून पोलिसांनी कारवाई केली पाहिजे अशी मागणी माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com