Special Report : महायुतीत ठणाठणी! शिंदेसेनेचं भाजपच्या नाईकांना ओपन चॅलेंज

Eknath Shinde Vs Ganesh Naik : नामोनिशाण मिटवण्यावरून भाजप आणि शिंदेसेनेत चांगलाच संघर्ष पेटलाय. अशातच शिंदेसेनेनं गणेश नाईकांना थेट आव्हानं दिलयं. ठाण्यात नाईक विरुद्ध शिंदे या वादात नवी ठिणगी पडलीय. महायुतीत नेमकं काय घडतयं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून
शिंदे-नाईक यांच्यात संघर्ष पेटला, शिंदेसेनेचं नाईकांना ओपन चॅलेंज
Eknath Shinde vs Ganesh Naiksaam tv
Published On
  • शिंदेसेनेचं नाईकांना थेट आव्हानं

  • नाईक विरुद्ध शिंदे संघर्ष पेटला?

  • नामोनिशाण मिटवण्यावरून महायुतीत घमासान

गणेश नाईकांच्या वक्तव्यावरून आता शिंदे सेना आणि नाईक यांच्यात पुन्हा नव्यानं संघर्ष पेटलाय. वनमंत्री गणेश नाईकांनी ठाण्यात शिंदेसेनेचं नामोनिशाण मिटवण्याचं विधान करून एकनाथ शिंदेंना डिवचलं आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या गणेश नाईकांना आवरा असं पत्र शिंदेसेनेच्या नरेश म्हस्केंनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना लिहलं. इतकचं काय तर शिंदेसेना संपवण्याची परवानगी द्या, मग बघू, असं आव्हानच म्हस्केंनी नाईकांना दिलंय.

एकीकडे नरेश म्हस्केंनी नाईकांना खुलं आव्हान दिलेलं असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांनी मात्र या विषयावर थेट बोलणं टाळलंय.

शिंदे आणि नाईकांमधील वर्चस्वाची लढाई काही नवी नाही. ठाण्यात शिंदेंचे राजकीय गुरू असणाऱ्या आनंद दिघेंपासून तब्बल गेली ३० वर्षे हा संघर्ष कायम आहे.

  • 1995 - ठाण्याच्या पालकमंत्रिपदावरुन आनंद दिघे आणि नाईकांमध्ये ठिणगी

  • 1999 - नाईकांनी शिवसेना सोडल्यानंतर भोईरांना ताकद देत दिघेंकडून नाईकांचा पराभव

  • 2004 - पालकमंत्री असताना नाईकांकडून एकनाथ शिंदेंना शह देण्याचा प्रयत्न

  • 2009 - गणेश नाईकांचे पुत्र संजीव नाईकांना खासदार बनवून शिंदेंना हादरा

  • 2014 - शिंदेंनी भाजपच्या आमदार मंदा म्हात्रेंना ताकद देत नाईकांना पराभूत केलं

खरं तर राज्यात महायुतीची सत्ता आल्यापासूनच गणेश नाईकांना भाजपकडून शिंदेंविरोधात बळ दिलं जात असल्याची चर्चा आहे. नाईकांनी ठाण्यामध्ये जनता दरबार घेत शिंदेंना शह दिला. तर मनपा निवडणुकीत हा संघर्ष आणखी पेटला. नाईकांनी नवी मुंबई महापालिकेत एकहाती भाजपचे 65 नगरसेवक निवडून आणून शिंदेंवर मात केल्यानं शिंदे आणि नाईकांमधील संघर्ष आणखीनच विकोपाला गेलाय.

अशातच मित्रपक्षाला संपण्याची भाषा होत असल्यानं ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवलीत महायुतीत सारंकाही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. त्यामुळे नाईक- शिंदेंचा हा वाद भविष्यात कोणत्या वळणावर जाणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com