Abdul Sattar: सिल्लोड न्यायालयात अब्दुल सत्तार अडचणीत; न्यायालयात याचिका दाखल, काय आहे कारण?

Abdul Sattar: शिंदे सेनेचे नेते आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या अडणीत वाढ झालीय. सत्तारांविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय. नेमकं काय आहे कारण?
Abdul Sattar
Abdul SattarSaam Tv
Published On

सिल्लोडचे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याविरोधात सिल्लोड न्यायालयात फौजदारी याचिका दाखल करण्यात आली आहे. सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ता महेश शंकरपल्ली आणि पुणे येथील डॉ. अभिषेक हरिदास यांनी अब्दुल सत्तार यांच्या नामनिर्देशन पत्र सोबत सादर केलेल्या शपथबद्ध शपथपत्रावर मतदान पूर्वीच लेखी आक्षेप सादर केला होता. मात्र सदर अक्षेपावर निवडणूक आयोगाने अजूनही कारवाई केलेली नाही.

त्यामुळे शपथपत्रात खोटी, भ्रामक आणि दिशाभूल माहिती देणे लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 कलम 125अ नुसार गुन्हा आहे. तक्रारीबाबत आयोगाने कोणतीच कारवाई न केल्यामुळे सदर प्रकरणात सिल्लोड दिवाणी तथा फौजदारी न्यायालयात फौजदारी याचिका क्र. 278/2024 दाखल केली आहे. भारतीय न्याय संहिता 2023 कलम 210, 223, लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 कलम 125अ व मानव संरक्षण अधिकार अधिनियम 1993 कलम 30 अन्वये सदर याचिका दाखल करण्यात आलेली आहे.

दरम्यान 2019 मध्येही सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरलाल शंकरपेल्ली व डॉ. अभिषेक हरिदास यांनी अब्दुल सत्तार यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. त्या प्रकरणीही आज तारीख मिळाली होती, परंतु सत्तार गैरहजर राहिल्याची माहिती याचिकाकर्त्यांनी दिलीय. सिल्लोड विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून अब्दुल सत्तार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या शपथपत्रात मालमत्तेची माहिती लपविल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरलाल शंकरपेल्ली व डॉ. अभिषेक हरिदास यांनी निवडणूक अधिकारी लतीफ पठाण यांच्याकडे केली होती.

तसेच निवडणूक आयोगाच्या अधिकृत पोर्टलवर देखील ऑनलाइन तक्रार दाखल केली होती. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, अब्दुल सत्तारांनी शपथपत्रामध्ये खोटी व दिशाभूल करणारी माहिती नमूद केली आहे. शपथपत्रात खोटी माहिती नमूद करणे प्रचलित कायद्यानुसार बेकायदेशीर असल्याने सत्तार यांचा उमेदवारी अर्ज रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केलीय.

दरम्यान या प्रकरणी निवडणूक आयोगाने दखल घेत त्यांना २४ तासात माहिती देण्याचे निर्देश दिले होते असं सांगितलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com