Ramdas Kadam News: उद्धव ठाकरेंनी शिवसेनाप्रमुखांच्या विचारांशी गद्दारी केली; रामदास कदम काय म्हणाले, वाचा...

Ramdas Kadam On Uddhav Thackeray: शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam On Uddhav ThackeraySaam TV
Published On

जितेश कोळी, साम टीव्ही

Shivsena News: उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवलं. त्यांनी शिवसेनेत हुकूमशाही गाजवली, असं म्हणत शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. बाप-बेट्यांनी खोटं बोल पण रेटून बोलण्याचा उद्योग सुरू केला आहे, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एकही आमदार नाराज नाही, असा टोला देखील रामदास कदम यांनी हाणला आहे.  (Latest Marathi News)

Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Aaditya Thackeray News: न्याय आपल्याच बाजूने होणार, ४० गद्दार हे राजकारणातून.., आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

शिंदे गटाचे नेते रामदास कदम हे आज रत्नागिरीत आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे यांच्यासह माजी मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार टीका केली. न्यायालयीन सल्ला देण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासोबत अनिल परब यांच्यासारखे चमचे आहेत, पण न्यायालयाला कोण सल्ले देऊ शकतं का? असा सवालही रामदास कदम यांनी केला.

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे वारंवार उच्चारत असलेल्या गद्दार या शब्दावरून देखील रामदास कदम यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुखांच्या विचारांशी गद्दारी केली, असा घणाघात देखील रामदास कदम यांनी केला आहे. शिवसेना प्रमुखांनी सांगितलं होतं, की ज्यादिवशी मला काँग्रेससोबत जायची वेळ येईल, त्या दिवशी मी शिवसेना नावाचं दुकान बंद करेन, अशी आठवण रामदास कदम यांनी करुन दिली आहे.

Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Turkey Earthquake News: तुर्कीप्रमाणे भारतातही भूकंप होणार? IIT प्राध्यापकाचा खळबळजनक दावा, केंद्रबिंदूही सांगितला

दरम्यान, सरकारमधील आमदार नाराज आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या या विधानावर रामदास कदम यांनी चांगलंच तोंडसुख घेतलं. बाप-बेट्यांनी खोटं बोल पण रेटून बोलण्याचा उद्योग सुरू केला आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एकही आमदार नाराज नाही. मंत्रीपदे मिळाली नसली तरी आमदारांना विकासासाठी निधी मिळतो आहे, पुढच्यावेळी आमचेच आमदार जास्त निवडून येतील, असा दावा रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केला आहे.

खरी शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाला मिळणार? याबाबत देखील रामदास कदम यांनी भाष्य केलं आहे. न्यायालयीन लढा आम्हीच जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदार, खासदार किती आहेत? धनुष्यबाण शिंदे गटालाच मिळणार, असं रामदास कदमांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर 2009 मधील निवणुकीत मला कोणी पाडलं होतं, याचा खुलासा जाहीर सभेतून करणार, असंही ते म्हणाले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com