Kashedi Tunnel: चाकरमान्यांसाठी खुशखबर! मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीतून सुटका, कशेडी बोगद्याची दुसरी लेन सुरू

Mumbai Goa Highway Traffic News: मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याची दुसरी मार्गिका मंगळवारपासून खुली करण्यात आलीय. त्यामुळे शिमगोत्सवापूर्वी कोकणवासीयांना थोडा दिलासा मिळणार आहे.
Mumbai-Goa Highway
Kashedi Tunnel Saam Tv
Published On

मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याची दुसरी मार्गिका मंगळवारपासून खुली करण्यात आलीय. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी बोगद्याच्या दुसरी लेन सुरू करण्याबाबत आदेश दिले आहेत. होळीच्या पार्श्वभूमीवर कशेडी बोगद्याची दुसरी लेन सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शिमगोत्सवापूर्वी कोकणवासीयांना थोडा दिलासा मिळणार आहे.

शिमगोत्सवाच्या कालावधीत कोकणात मुंबई आणि पुणे येथून येणार्‍या चाकरमान्यांची संख्या अधिक असते. जास्त प्रवासी रस्ते मार्गावरून प्रवास करतात. सध्या महामार्गाचे चौपदरीकरण काम सुरू आहे. माणगाव इंदापूरमध्ये रस्ता अरुंद असल्यानं वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळे प्रवाशांचा अधिक वेळ वाया जातो. कशेडी बोगद्याची दुसरी लेन सुरू केल्यामुळे प्रवाशांनी वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

Mumbai-Goa Highway
Beed News: मारहाण करणं अंगलट! देशमुखांच्या साडूविरोधात गुन्हा दाखल, अटक कधी?

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी १५ दिवसांपूर्वी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली होती. त्यांनी या दौऱ्यादरम्यान कशेडी बोगद्याची देखील पाहणी केली होती. शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी बोगद्याची दुसरी लेन सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे दुसरी लेन आता प्रवाशांसाठी खुली केली आहे.

Mumbai-Goa Highway
BJP MLA: भाजप आमदारानं एजंट बॉम्ब फोडला, विधानसभेत प्रश्न न लावण्यासाठी पैशांचा व्यवहार; धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी

माणगाव आणि इंदापूरमध्ये कोकणात जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांग रांगा लागल्या आहेत. त्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असून, माणगाव इंदापूरमध्ये रस्ता अरुंद असल्याकारणाने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com