आयुषी खेडकर
आयुषी खेडकर

आयुषीला थेट शरद पवारांचा फोन...!

Published on

अहमदनगर ः पाथर्डी तालुक्यातील कन्येने थेट वायुदलात झेप घेतली आहे. तिची पायलट म्हणून निवड झाल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पवार कुटुंबही तिच्या या कामगिरीवर खूश आहे. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी तिच्याविषयी फेसबुक पोस्ट करीत शुभेच्छा दिल्या होत्या. आता थेट राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आयुषीला आशीर्वाद दिले आहेत.

आयुषी ही पाथर्डी तालुक्यातील डॉ. मनिषा खेडकर यांची कन्या आहे. वायुदलात झालेल्या निवडीने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. शरद पवार यांनीही तिच्या कामगिरीची दखल घेतली आहे. त्यांनी थेट तिला फोन केला. तुझी निवड देशहिताची आहे. तुझे प्रशिक्षण झाल्यानंतर मला भेटायला ये...असे तिला निमंत्रणही दिले.Sharad Pawar's phone call to Ayushi Khedkar

आयुषी खेडकर
विखे पाटलांनी महाविकास आघाडी आतून पोखरली!

हैदराबाद येथे आयुषीचे प्रशिक्षण होणार आहे. तिकडे रवाना होण्यापूर्वी शरद पवार यांचा फोन आल्याने आयुषी भलतीच खूश आहे. तिची आई डॉ. मनिषा खेडकर यांनाही आयुषीच्या कामगिरीचा अभिमान आहे. ोपवारांच्या कौतुकाने भारावून गेलेल्या आयुषीने मी नक्कीच भेटायला येईल असे सांगितले.

आयुषीच्या यशाचे कौतुक सर्वच स्तरातून होत आहे. शरद पवारांनी फोन करुन तिचे कौतुक केले व भेटायला बोलाविले आहे. आयुषीचा मुलगी म्हणून अभिमान वाटतोय. आता ती देशाची मुलगी ठरतीय याचा आनंद द्विगुणित झालाय, अशी प्रतिक्रिया डॉ. मनिषा खेडकर यांनी दिली.Sharad Pawar's phone call to Ayushi Khedkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com