Sharad Pawar : भाजपसोबत जाण्याची इच्छा नव्हती, नसणार; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर शरद पवारांचं विधान

Sharad Pawar on Ajit pawar : अजित पवारांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. अजित पवारांच्या विधानानंतर आता शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Sharad Pawar : भाजपसोबत जाण्याची इच्छा नव्हती, नसणार; अजित पवारांच्या वक्तव्यावर शरद पवारांचं विधान
Sharad Pawar Saam tv
Published On

सुशील थोरात, अहमदनगर

अहमदनगर : लोकसभा निवडवणुकीदरम्यान अजित पवार आणि शरद पवारांच्या आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. पहाटेच्या शपथविधीवरून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता, मात्र शरद पवारांनी शब्द फिरवला. पण मी अमित शहांना दिलेला शब्द पाळला,असा दावा अजित पवारांनी केला होता. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. अजित पवारांच्या विधानानंतर आता शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

शरद पवार आज शनिवारी नगरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शरद पवारांनी देशासहित राज्यातील घडामोडीवर भाष्य केलं. तसेच यावेळी शरद पवारांनी अजित पवारांच्या वक्तव्यावरही मोठं विधान केलं.

Sharad Pawar : भाजपसोबत जाण्याची इच्छा नव्हती, नसणार; अजित पवारांच्या वक्तव्यावर शरद पवारांचं विधान
Dr. Jyoti Mete : मोठी बातमी! शिवसंग्रामच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे यांची लोकसभा निवडणुकीतून माघार

शरद पवारांनी अजित पवारांना काय प्रत्युत्तर दिलं?

अजित पवार म्हणाले होते की,'पहाटेच्या शपथविधीपूर्वी शरद पवार यांच्यासह आमची अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली होती. भाजपसोबत जाण्याची निर्णय आम्ही घेतला होता. ऐनवेळी शरद पवारांनी शब्द फिरवला. मात्र, मी अमित शहा यांना दिलेला शब्द पाळला. त्यामुळे पहाटेच्या शपथविधी झाला, असा दावा अजित पवार यांनी केला आहे. त्याला शरद पवारांनी उत्तर दिले आहे. 'भाजपसोबत जाण्याचा आमची इच्छा नव्हती, आणि कधीही नसणार, असे पवारांनी सांगितले .

Sharad Pawar : भाजपसोबत जाण्याची इच्छा नव्हती, नसणार; अजित पवारांच्या वक्तव्यावर शरद पवारांचं विधान
Saam EXCLUSIVE : 'साम'च्या वृत्तावर शिक्कामोर्तब! नाशिमधून हेमंत गोडसे हेच लोकसभा लढणार

अहमदनगरमध्ये मविआ विरुद्ध महायुती अशी न राहता विखे विरुद्ध पवार अशी असल्याचे चित्र रंगवले जात असल्याबाबत शरद पवार यांना विचारले असता, मी काही अहमदनगरमधून निवडणूक अर्ज भरलेला नाही. उगीच स्वतःच महत्व वाढवण्यासाठी दुसऱ्याचे नाव घेणं हे काही शहाणपणाचे लक्षण नाही, असा टोला शरद पवारांनी सुजय विखेंना लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com