काेल्हापूर : ज्येष्ठ नेते प्रा. डाॅ. एन.डी. पाटील (N D Patil) यांच्या पार्थिव देहाचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी काेल्हापूरातील रुग्णालयात जाऊन घेतले. त्यानंतर त्यांनी त्यांची भगिनी व एन. डींच्या पत्नी सराेजनी यांची भेट घेऊन सांत्वन केले. (sharad pawar meets sister sarojini patil in kolhapur) माध्यमांशी बाेलताना पवार म्हणाले संघर्षात कायम एन.डी. यशस्वी झाले. परंतु हा योद्धा शेवटच्या संघर्षामध्ये यशस्वी होऊ शकला नाही. कदाचित हे वाढत्या वयाेमानामुळं असेल. दरम्यान राज्यातील नवी पिढी प्रा. डाॅ. एन. डी. पाटील यांचा आदर्श समोर ठेवून सर्व सामान्य जनतेसाठी कार्यरत राहील असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. (ncp leader sharad pawar recalls memories of n d patil in kolhapur)
ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) म्हणाले एनडींची (n d patil) विचारधारा डावी होती. ही विचारसरणी त्यांनी आयुष्यभर जपली. सामान्यांसाठी ते झटत राहिले. स्वतःसाठी ते काेणत्याही प्रलाेभनास बळी पडले नाही. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा विचाराने ते प्रेरीत झाले हाेते. कर्मवीरांचा विचार पुढं नेण्यासाठी त्यांनी पुर्ण आयुष्य समर्पित केलं.
ते संघर्षात कधीही अपयशी ठरले नाही असे आवर्जुन पवार यांनी नमूद केले. परंतु वयाेमानानूसार त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण हाेऊ लागले. त्यातही त्यांनी २ वेळा मात केली.परंतु हा योद्धा शेवटच्या संघर्षात यशस्वी होऊ शकला नाही. खरं तर त्यांच वय जास्त झाल्याने ते हाेऊ शकलं नाही अशी खंत पवार यांनी व्यक्त केली. आज ते आपल्यात नसले तरी महाराष्ट्रातील नवी पिढी त्यांचा आदर्श डाेळ्यासमाेर ठेवून कार्यरत राहील. त्यांनी दाखविलाल रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करेल असा विश्वास वाटताे. त्यात जेवढे यश मिळेल तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असेही पवार यांनी नमूद केले.
edited by : siddharth latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.