Sharad Pawar News
Sharad Pawar Newssaam tv

NCP Political News : राष्ट्रवादी शरद पवार गटाला आणखी एक धक्का बसणार; धुळ्यातील बड्या नेत्याचा राजीनामा?

Dhule Political News : अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल गोटे लवकरच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊ शकतात.
Published on

भूषण अहिरे

Dhule News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट समोर आले. पक्षातील अनेक मोठे नेते अजित पवारांसोबत गेले आहे. आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाला धुळे जिल्ह्यात लवकरच मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल गोटे लवकरच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊ शकतात.

राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचा अनिल गोटे यांनी गुरुवारीच पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा पाठवला आहे. लवकरच अनिल गोटे अजित पवार किंवा शिवसेना उद्धव ठाकरे गटात जाण्याची शक्यता आहे.

गोटे हे धुळे शहराचे माजी आमदार आहेत, भाजप पक्षाकडून गोटे हे राजीनामा देऊन गेल्या चार वर्षांपूर्वी ते राष्ट्रवादीत आले होते, तर राष्ट्रवादीपक्षात गोटे यांना प्रदेश उपाध्यक्ष पद देण्यात आले होते,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com