ऐकलंत... भाजपचं ऑपरेशन लोटस, नगरपरिषद निवडणुकीतील एकमेकांवर केलेली टोकाची टीका आणि त्यानंतर भाजप आणि शिंदेसेना पुन्हा एकदा आमने-सामने आलीय ती पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी केलेल्या वक्तव्यामुळे.... एकनाथ शिंदेंच्या निर्णयामुळेच भाजप सत्तेत आल्याचं वक्तव्य करुन देसाईंनी भाजपला डिवचलंय.. तर देसाईंच्या वक्तव्याचा भाजपनंही खरपूस समाचार घेतलाय...
आता देसाईंच्या वक्तव्यामुळे वाद पेटला असला तरी त्याला किनार आहे ती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढांनी केलेल्या वक्तव्याची... देवाभाऊ सगळे पक्ष चालवत असल्याचं वक्तव्य लोढांनी केलं होतं... त्याला प्रत्युत्तर देतांना गायकवाडांनीही शिंदेंमुळेच भाजप सत्तेत आल्याचं वक्तव्य केलंय...
एका बाजूला नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीदरम्यान भाजप आणि शिंदेसेनेत रंगलेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी समन्वय बैठकीचं आयोजन करण्यात आलंय.. मात्र दुसरीकडे आपल्यामुळेच महायुतीची सत्ता, हे सांगताना भाजप आणि शिंदेसेनेत संघर्ष पेटलाय... त्यामुळे समन्वय समितीच्या बैठकीनंतर तरी या वादावर पडदा पडणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.