

Mumbai News: राज्यात यंदा उन्हाळ्याची मोठी झळ बसताना पाहायला मिळत आहे. राज्यभरात कडक उन्हाळ्याची नोंद होत आहे. त्यामुळेच उन्हाळ्यानंतर शाळा सुरू होण्याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील शाळा ( School) यंदा 15 जून रोजी सुरू होणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी दिली आहे. तर विदर्भात (Vidharbh) उन्हाची तीव्रता जास्त असल्याने त्या ठिकाणी 30 जून रोजी शाळा सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी उन्हाळ्यानंतर शाळा सुरू होण्याबाबत महत्वाची माहिती सांगितली आहे. मुलांना आपल्या सुट्या व्यवस्थित प्लान करता याव्यात यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे ते यावेळी म्हणाले.
मोफत वह्या, शूज आणि सॉक्स...
दिपक केसरकर म्हणाले, "केंद्राचा नवभारत साक्षरता कार्यक्रम घेतला जाणार आहे. यापुढे शासकिय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पहिली ते आठवी मुलांचे शाळेचे कपडे, वह्या, शूज आणि सॉक्स हे शासनातर्फे मोफत दिले जाणार आहेत. तसेच प्रत्येक धड्यानंतर आता एक पान कोरे ठेवले जाणार आहे."
आजी आजोबा दिवस साजरा होणार...
येत्या शैक्षणिक वर्षात एकत्रित कुटुंब पद्धतीमुळे 'आजी आजोबा दिवस' साजरा करण्यात येणार असल्याचीही माहिती दिपक केसरकर यांनी दिली आहे. "राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण दिले जाणार. 20 मे पर्यंत सर्व त्रूटी पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना अनुदान देण्यात येणार आहे. शिक्षक सेवकांच्या पगारात वाढ करण्यात आली आहे. शिष्यवृत्तीमध्येही वाढ करण्यात आली आहे.
तसेच यावेळी बोलताना, "कमी पटसंख्येंच्या शाळा बंद कराव्या लागू नयेत यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. पायाभूत सुविधा वाढवल्या जाणार आहेत. मराठीकडे आकर्षित करण्यासाठी उच्च शिक्षणही मराठीमध्ये करणार आहोत. मुलाच्या शाळेतील पहिल्या पावलाचे स्वागत केलं जाणार असल्याचेही" ते म्हणाले आहेत. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.