Maharashtra Politics: पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांना धक्का, दिग्गज नेत्याचा मुलगा भाजपच्या वाटेवर

NCP Leader Satyajit Patankar to Join BJP: महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी जोरात सुरू असतानाच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला साताऱ्यातून मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
BJP Rashtrawadi
BJP RashtrawadiSaam
Published On

महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. अशातच साताऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र सत्यजीत पाटणकर हे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. सोमवारी पाटणकर गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पुढील राजकीय निर्णयाची घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

राज्यातील महापालिका निवडणुका पुढील ४ महिन्यांत घेण्यात यावे, असे महत्त्वापूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, प्रत्येक नेता आगामी निवडणुकांसाठी तयारी लागला आहे.

कुठे फोडाफोडीचं राजकारण तर, कुठे नेते मंडळी स्वेच्छेने पक्षाला रामराम ठोकत आहेत. अशातच भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे.

BJP Rashtrawadi
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या नणंदेच्या खास मित्राच्या घरावर पोलिसांची मोठी कारवाई; मध्यरात्री चव्हाणच्या घरी नेमकं काय घडलं?

सत्यजीत पाटणकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. पाटणकर भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.

सत्यजीत पाटणकर हे पाटण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रमुख चेहरा मानले जात होते. सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व मंत्री शंभुराज देसाई करीत आहेत. पाटणकरांच्या पक्षप्रवेशामुळे देसाई यांना स्थानिक पातळीवर आतील आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र पाटणकरांच्या पक्षप्रवेशामुळे भाजप आणखी बळकट होणार, असा अंदाज वर्तवला जात आहे.

BJP Rashtrawadi
Shocking Crime: कौटुंबिक वाद अन् बायकोनं नवऱ्याचं गुप्तांग कापलं, हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे पत्नीनं विष पिऊन..

पाटणकर गटाने सोमवारी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पुढील राजकीय निर्णयाची घोषणा होण्याची शक्यता आहे. भाजपशी युती, थेट प्रवेश किंवा स्वतंत्र निर्णय, यावर बैठकीत अंतिम चर्चा होणार, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com